शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

CoronaVirus News: राज्यात रविवारी १८,६०० नवे कोरोनाबाधित; सार्वजनिक आरोग्य विभागाची माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 07:47 IST

दिवसभरातील २२ हजार ५३२ रुग्णांसह आजपर्यंत एकूण ५३ लाख ६२ हजार ३७० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या ९३.५५ टक्के इतके आहे.

मुंबई : राज्यात रविवारी १८ हजार ६०० नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५७ लाख ३१ हजार ८१५ झाली आहे, तर दुसरीकडे बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे. दिवसभरातील २२ हजार ५३२ रुग्णांसह आजपर्यंत एकूण ५३ लाख ६२ हजार ३७० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या ९३.५५ टक्के इतके आहे.राज्यभरात सध्या २ लाख ७१ हजार ८०१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, तर रविवारी ४०२ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली .सध्या राज्यातील मृत्युदर १.६५ टक्के इतका आहे. आतापर्यंत ९४ हजार ८४४ नागरिकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.आजपर्यंत तपासण्यात आलेल्या तीन कोटी ४८ लाख ६१ हजार ६०८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५७ लाख ३१ हजार ८१५ नमुने पॉझिटिव्ह आले असून, हा दर १६.४४ टक्के इतका आहे. सध्या राज्यात १९ लाख ९८ हजार ९७६ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर १२ हजार ९८१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.  ठाणे जिल्ह्यात ७०८ रुग्ण ठाणे : जिल्ह्यात कोरोनाचे ७०८ रुग्ण रविवारी आढळून आले असून ५१ जण दगावले आहेत. आता जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या पाच लाख १५ हजार ८२७ झाली असून नऊ हजार २१४ मृतांची नोंद केली आहे.ठाणे शहरातही १४४ रुग्ण सापडले असून आतापर्यंत एकूण एक लाख २८ हजार ८६८ रुग्ण नोंदले आहेत.  कल्याण - डोंबिवलीला १५८ रुग्ण आढळून आले असून २२ मृत्यू झालेत. उल्हासनगरला ६३ रुग्ण आढळले असून दोन मृत्यू झाले आहेत. भिवंडीला १० रुग्ण सापडले असून एकाचा मृत्यू झाला आहे. मीरा-भाईंदरला ८७ रुग्ण सापडले असून तीन मृत्यू आहेत.  अंबरनाथ शहरात ३१ रुग्ण सापडले असून एकही मृत्यू नाही. बदलापूरला २५ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे बाधित रुग्ण २० हजार ५५८ असून एकही मृत्यू नसल्यामुळे मृत्यूसंख्या २५४ आहे. .

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस