शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
3
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
5
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
6
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
7
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
8
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
9
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
10
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
11
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
12
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
13
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
14
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
15
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
16
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
17
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
18
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
19
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
20
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!

coronavirus: 'जवा नवीन पोपट हा, लागलाय घरामंदीच राहा, असं सांगायला'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 3:12 PM

सोशल मीडियात इटली, जर्मनी, अमेरिका आणि विदेशातील भारतीयांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. तेथील परिस्थिती सांगत कोरोनाबद्दल घ्यावयाच काळजी

मुंबई - कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून, महाराष्ट्राला याचा सर्वाधिक फटका बसला आहे.  राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची दिवसेंदिवस वाढत असून कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आता जवळपास १०० पर्यंत पोहचली आहे. तर कोरोनामुळं ६५ वर्षीय रुग्णाचा आज मृत्यू झाला आहे. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. त्यामुळे राज्यातील कोरोना बळींचा आकडा आता चारवर गेला आहे. देशभरातील जवळपास सर्वच राज्यात लॉक डाऊन करण्यात आलंय. तरीही, लोकं घरातून बाहेर पडत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सर्वच स्तरांतून लोकांना घरातच राहण्याचं आवाहन करण्यात येतंय. वेगवेगळ्या संकल्पना लढवून नागरिकांना घरी बसण्याचं सांगण्यात येत आहे. 

सोशल मीडियात इटली, जर्मनी, अमेरिका आणि विदेशातील भारतीयांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. तेथील परिस्थिती सांगत कोरोनाबद्दल घ्यावयाच काळजी या व्हिडीओच्या माध्यमातून सांगितली जात आहे. तसेच, वेगवेगळ्या हटके संकल्पना लढवून पोलिसांना सहकार्य करा, घरातच बसा, असे सांगण्यात येत आहे. दिल्लीतील महाराष्ट्र परिचय केंद्राकडून एक फोटो ट्विट करण्यात आला आहे. या फोटोमध्ये झाडाच्या बुंध्यातील आपल्या घरात बसलेला पोपट दिसून येतो. या पोपटाप्रमाणे वागायची वेळ आता आली असल्याचं सांगत नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन महाराष्ट्र परिचय केंद्राने केले आहे. जवा नवीन पोपट हा लागला, घरी बसा असं सांगायला... अशा टॅगलाईनने हा फोटो ट्विटरवरुन शेअर करण्यात आला आहे. 

कोरोनासंदर्भात अद्यापही नागरिकांमध्ये गांभीर्य दिसत नसून लोक घराबाहेर पडत आहेत. विनाकारण रस्त्यावर आणि भाजी मार्केटमध्ये गर्दी करत आहेत. त्यामुळे कोरोनाची जनजागृती गरजेची आहे. दरम्यान, कोरोनाचा धोका टाळण्यासाठी महाराष्ट्र सरकारने अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र परिस्थिती गंभीर असतानाही लोक लॉकडाऊनची बंधने झुगारून घराबाहेर निघत असल्याचे दिसून येत होते. नागरिकांच्या बेजबाबदार वागणुकीमुळे राज्यात 31 मार्चपर्यत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहिर केला. तर, देशभरातील ३० राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्येही लॉक डाऊन आहे. आंतरराज्य आणि आंतरजिल्हा वाहतूकही बंद ठेवण्यात आली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबईUddhav Thackerayउद्धव ठाकरे