CoronaVirus: खासदारांचा १९६ कोटींचा निधी केंद्राकडे पडून; अमोल कोल्हेंचे पंतप्रधान मोदींना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 08:12 PM2021-04-27T20:12:05+5:302021-04-27T20:14:35+5:30

CoronaVirus: खासदार अमोल कोल्हे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.

coronavirus mp amol kolhe demands to pm narendra modi to give mp fund for health infrastructure | CoronaVirus: खासदारांचा १९६ कोटींचा निधी केंद्राकडे पडून; अमोल कोल्हेंचे पंतप्रधान मोदींना पत्र

CoronaVirus: खासदारांचा १९६ कोटींचा निधी केंद्राकडे पडून; अमोल कोल्हेंचे पंतप्रधान मोदींना पत्र

googlenewsNext
ठळक मुद्देखासदार अमोल कोल्हेंचे पंतप्रधान मोदींना पत्रसंसद भवनपेक्षा माणसे वाचवणे महत्त्वाचेआरोग्य सुविधा उभे करणे अत्यंत गरजेचे

मुंबई: देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. तर, कोरोनामुळे होणारे मृत्यूही वाढले आहेत. ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, कोरोना लस, बेड्स यांचा तुटवडा जाणवत आहे. केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. अशातच आता खासदार अमोल कोल्हे यांनी पंतप्रधाननरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. केंद्राकडे पडून असलेला खासदार निधी देण्याची मागणी पंतप्रधान मोदींना अमोल कोल्हे यांनी केली आहे. (coronavirus mp amol kolhe demands to pm narendra modi to give mp fund for health infrastructure)

खासदार अमोल कोल्हे यांनी एक व्हिडिओ शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून खासदार निधी देण्याची मागणी केल्याचे म्हटले आहे. खासदारांना केंद्राकडून ५ कोटींचा निधी मिळतो. मात्र, यापूर्वी न मिळालेला जवळपास १९६ कोटी रुपयांचा खासदार निधी पडून आहे आणि त्यानंतरच्या वर्षात तो देण्यात आलेला नाही, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे. 

“रेमडेसिवीरच्या केवळ घोषणा, कुणाकडे टाहो फोडायचा, हे सरकार नावाच्या मुर्दाड यंत्रणेने सांगावं”

आरोग्य सुविधा उभे करणे अत्यंत गरजेचे

आताच्या घडीची कोरोना संकटाची स्थिती पाहिली, तर प्रत्येक मतदारसंघामध्ये आरोग्य सुविधा उभ्या करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे जर हा निधी मिळाला तर त्याचा मोठा फायदा होणार आहे. महाराष्ट्रात ४८ खासदार आहेत. जर त्यांना त्यांच्या मतदारसंघासाठीचा निधी दिला, तर संपूर्ण राज्यभरात या माध्यमातून मोठी आरोग्य सुविधा उभी करता येऊ शकते. गरज असेल त्यानुसार जम्बो कोविड सेंटर, ऑक्सिजन प्लांट यासाठी हा निधी लोकप्रतिनिधी वापरू शकतील. त्याद्वारे आरोग्य व्यवस्था बळकट करता येईल, असा विश्वास अमोल कोल्हे यांनी या पत्रातून व्यक्त केला आहे. 

तुम्हाला परिस्थिती सांभाळता येत नसेल तर सांगा, केंद्राला जबाबदारी देतो: दिल्ली हायकोर्ट 

संसद भवनपेक्षा माणसे वाचवणे महत्त्वाचे

आजच्या घडीला संसद भवन किंवा इतर गोष्टींपेक्षा माणसे वाचवणे गरजेचे आहे, असा टोला लगावत महाराष्ट्र सरकारने सर्व आमदारांना त्यांच्या आमदार निधीपैकी एक कोटी रुपयांचा निधी कोरोनाच्या कामांसाठी वापरण्याची परवानगी दिली आहे. अशाच प्रकारचा निर्णय केंद्राने घेतल्यास लोकप्रतिनिधींना त्यांच्या मतदारसंघांमध्ये कामे करता येईल, असेही अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.  

मोफत लसीकरणासाठी BMC च्या एफडी मोडा; शिवसेना खासदाराचे उद्धव ठाकरेंना पत्र

दरम्यान, केंद्र सरकार आणि विरोधी पक्षातील नेते विविध मुद्द्यांवरून आमने-सामने उभे असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यात आता अमोल कोल्हे यांनी पुन्हा एकदा खासदार निधीचा मुद्दा उपस्थित केल्याने यावरून पुन्हा एकदा राजकारण तापण्याची चिन्हे दिसत असून, नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 
 

Web Title: coronavirus mp amol kolhe demands to pm narendra modi to give mp fund for health infrastructure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.