शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Death : हृदयद्रावक! आधी माय लेकाचा कोरोनानं मृत्यू; पत्नीसह मुलीलाही संसर्ग, कोरोनानं संपूर्ण कुटुंबाला घेरलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2021 18:16 IST

CoronaVirus Death : धक्कादायक बाब म्हणजे सागरची प्रकृती सुधारत असतानाच अचानक बुधवारी रात्री अकराच्या सुमारास त्याचाही दुर्दैवी मृत्यू झाला.

कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे सर्वच ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना व्हायरसमुळे कुटुंबच्या कुटुंब उद्धवस्त होताना दिसून येत आहे, हे चित्र खूपच भयावह आहे. ऑक्सिजनची कमतरता, रेमडेसिविरचा तुटवडा, कमी बेड्सची उपलब्धता असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. अशातच एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. पालघर जिल्ह्याच्या वाडा तालुक्यातील ऐनशेत गावातील माय-लेकाचा कोरोनाने बळी घेतल्यामुळे ठाकरे कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. 

आईचा कोरोनामुळे मृत्यू झाला आणि वडीलही गंभीर संक्रमणामुळे रुग्णालयात दाखल आहेत. इतकंच नाही तर पत्नी आणि मुलालाह कोरोनाची लागण झाली आहे.  अशा स्थितीत कुटुंबाचा आधार असलेल्या सागरचा कोरोनाने मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण नातेवाईकांमध्ये शोककळा पसरली आहे. सागरचं फक्त ३४ वर्षे होतं. इतक्या कमी वयात कोरोनानं या मुलाचा मृत्यू झाल्यामुळे लोकांच्या मनात अधिकचं भीतीचं वातावरण पसरलं आहे. 

अशी झाली सुरूवात

पालघरमधील ऐनशेत गावात वास्तव्यास असलेल्या सरिता सदानंद ठाकरे यांना आणि त्यांच्या पतीला कोरोनाचा संसर्ग झाला. यानंतर पतीला रिव्हेरा हॉस्पिटलमध्ये तर सरिता यांना  भिवंडी इथल्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यात सरिता यांचा उपचारादरम्यान १० एप्रिलला दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूच्या तिसऱ्या दिवशी मुलगा सागर यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने उपचारासाठी कल्याणच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. कौतुकास्पद! १३ महिन्यात एकही पॉझिटिव्ह केस नाही, कोरोनाच्या लाटेपासून भारतातल्या गावानं 'असा' केला बचाव

धक्कादायक बाब म्हणजे सागरची प्रकृती सुधारत असतानाच अचानक बुधवारी रात्री अकराच्या सुमारास त्याचाही दुर्दैवी मृत्यू झाला. या आई मुलाच्या या दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण वाडा तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. सागरला पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. वाडा तालुक्यात कोरोना व्हायरसमुळे  हा 60 वा बळी असून कोरोनवर उपचार होईल, अशा अत्याधुनिक व्यवस्था वाढवण्याची मागणी स्थानिकांनी लावून धरली आहे.  आता मृतांमध्ये झपाट्यानं वाढतंय तरूणांचं प्रमाण; 'ही' लक्षणं दिसल्यास लगेचच करा चाचणी

टॅग्स :palgharपालघरcorona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्रCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यू