CoronaVirus News: राज्यातील १२ लाखांहून अधिक रुग्ण कोविडमुक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2020 03:12 AM2020-10-09T03:12:13+5:302020-10-09T03:12:31+5:30

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.१३ टक्क्यांवर पोहोचले असून, सध्या २ लाख ४१ हजार ९८६ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

CoronaVirus More than 12 lakh covid patients cured in state | CoronaVirus News: राज्यातील १२ लाखांहून अधिक रुग्ण कोविडमुक्त

CoronaVirus News: राज्यातील १२ लाखांहून अधिक रुग्ण कोविडमुक्त

Next

मुंबई : राज्यात गुरुवारी कोरोनाचे १५ हजार ५७५ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर आतापर्यंत १२ लाख १२ हजार १६ रुग्ण कोविडमुक्त झाले. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.१३ टक्क्यांवर पोहोचले असून, सध्या २ लाख ४१ हजार ९८६ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यात दिवसभरात कोरोनाचे १३ हजार ३९५ बाधित रुग्ण आढळले असून, ३५८ मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता १४ लाख ९३ हजार ८८४ वर पोहोचली असून, बळींचा आकडा ३९ हजार ४३० वर पोहोचला आहे. दरम्यान, राज्याचा मृत्युदर सध्या २.६४ टक्के आहे.

Web Title: CoronaVirus More than 12 lakh covid patients cured in state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.