शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : गुड न्यूज! राज्यातील तब्बल 15 लाख जणांनी जिंकली कोरोनाची लढाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2020 21:04 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्या 16 लाखांवर पोहोचली आहे. आज कोरोनाचे 5,369 रुग्ण आढळले असून 113 जणांचा मृत्यू झाला आहे

मुंबई - देशात कोरोनाने थैमान घातले आहे, रुग्णांच्या संख्येने 81 लाखांचा टप्पा पार केला असून रुग्णांचा आकडा 81,84,083 वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत देशभरात तब्बल 1,22,111 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्या 16 लाखांवर पोहोचली आहे. आज कोरोनाचे 5,369 रुग्ण आढळले असून 113 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र याच दरम्यान एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. 

राज्यात आतापर्यंत तब्बल 15 लाख लोकांनी कोरोनावर मात केली असून 15,14,079 जणांनी कोरोनाची लढाई जिंकली आहे. तसेच 3,726 रुग्णांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात एकूण कोरोनाचे 1,25,109 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 89.92% झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात रविवारी (1 नोव्हेंबर) कोरोनाचे 5,369 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 113  जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णांची एकूण संख्या 16,83,775 वर पोहोचली आहे. 

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा तब्बल 44 हजारांवर पोहोचला असून आतापर्यंत 44,024 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. तर याच दरम्यान एक दिलासादायक बाब देखील समोर आली आहे. तब्बल 15 लाख लोकांनी कोरोनावर मात केली आहे. 15,14,079 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कोरोना चाचणीचे प्रमाण देखील वाढवण्यात आले आहे. 

मोठा दिलासा! कोरोना हरणार, देश जिंकणार; ५० टक्क्यांनी कमी होतेय रुग्णवाढ, सुखावणारा ग्राफ

देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91.15 टक्क्यांवर पोहोचले आहे, तर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 6 लाखांहून कमी झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून भीतीचे वातावरण निर्माण केलेल्या कोरोनाबाबत आता महत्त्वाची महिती समोर आली आहे. सप्टेंबरच्या मध्यावर शिखर गाठल्यानंतर कोरोनाचा ग्राफ आता 50 टक्क्यांनी खाली घसरला आहे. रुग्ण आणि मृत्यूच्या वाढीच्या तुलनेत घट झाल्याचं स्पष्ट होत आहे. गेल्या सात दिवसांची सरासरी पाहिली असता गुरुवारपर्यंत देशात 47 हजार रुग्ण दररोज आढळत होते. ही संख्या 17 सप्टेंबरच्या कोरोनाने रुग्ण संख्येच्या अर्धीच आहे. तर दुसरीकडे कोरोनाचा संसर्ग तीव्र गतीने होत असताना गेल्या एका आठवड्यापासून 50 टक्के कमी रुग्णवाढ होत आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्र