Coronavirus Maharashtra Updates: महाराष्ट्रात २४ तासांत ५६ हजार ६४७ कोरोनाबाधित आढळले तर ६६९ मृत्यूची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 08:24 PM2021-05-02T20:24:13+5:302021-05-02T20:24:43+5:30

राज्यात आजपर्यंत एकूण ३९ लाख ८१ हजार ६५८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८४.३१% एवढे झाले आहे.

Coronavirus Maharashtra Updates: 56647 coronaviruses were found and 669 deaths in 24 hours | Coronavirus Maharashtra Updates: महाराष्ट्रात २४ तासांत ५६ हजार ६४७ कोरोनाबाधित आढळले तर ६६९ मृत्यूची नोंद

Coronavirus Maharashtra Updates: महाराष्ट्रात २४ तासांत ५६ हजार ६४७ कोरोनाबाधित आढळले तर ६६९ मृत्यूची नोंद

Next

मुंबई – राज्यात कोरोना रुग्णांच्या आकडेवारील शनिवारच्या प्रमाणात काही घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. शनिवारी राज्यात ६३ हजाराहून अधिक कोरोनाबाधित आढळले होते तर रविवारी ५६ हजार ६४७ कोरोना बाधित आढळले आहेत. त्याचसोबत आज राज्यात ६६९ कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. दिवसभरात ५१ हजार ३५६ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याची दिलासादायक बातमीही आहे. 

राज्यात आजपर्यंत एकूण ३९ लाख ८१ हजार ६५८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८४.३१% एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ७६ लाख ५२ हजार ७५८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४७ लाख २२ हजार ४०१ (१७.०८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३९ लाख ९६ हजार ९४६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २७ हजार ७३५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज बाधित झालेल्या विभागनिहाय आकडेवारी

मुंबई – ३६२९

ठाणे - १०९२

ठाणे मनपा - ७५१

नवी मुंबई मनपा -४७०

कल्याण डोंबवली मनपा -७४२



 


ठाणे विभागात ९७००, नाशिक विभाग ८०२४, पुणे विभागात १५७७६, कोल्हापूर विभागात ३८२८, औरंगाबाद विभागात ३२४०, लातूर विभागात ३५६९, अकोला विभागात ३६०१, नागपूर विभागात ८९०९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

आज नोंद झालेल्या एकूण ६६९ मृत्यूंपैकी ३५० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १५३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १६६ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.  हे १६६ मृत्यू, पुणे-५२, ठाणे-२३, नाशिक-२०, यवतमाळ-१३, नांदेड-९, भंडारा-८, हिंगोली-८, रायगड-६, जळगाव-४, लातूर-४, चंद्रपूर-३, नागपूर-३, सांगली-३, वाशिम-३, औरंगाबाद-२, सोलापूर-२, जालना-१, परभणी-१ आणि सातारा-१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.

Web Title: Coronavirus Maharashtra Updates: 56647 coronaviruses were found and 669 deaths in 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.