शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : लॉकडाऊनमुळे रुग्णसंख्या कमी झाल्याचं सिद्ध झालं नाही; आता लोकं रस्त्यावर उतरतील - संदीप देशपांडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 13:35 IST

लोकांच्या आरोग्याचं संरक्षण करणं याला आमचं प्राधान्य असल्याचं म्हणत मुख्यमंत्र्यांनी दिले होते लॉकडाऊनचे संकेत

ठळक मुद्देलोकांच्या आरोग्याचं संरक्षण करणं याला आमचं प्राधान्य असल्याचं म्हणत मुख्यमंत्र्यांनी दिले होते लॉकडाऊनचे संकेतकांनी कोरोना विषयक नियम पाळले नाहीतर लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही, असं आरोग्यमंत्री म्हणाले होते.

एकीकडे आपण कोविड परिस्थितीतही अर्थव्यवस्था सुरु राहील याचा आटोकाट प्रयत्न करतोय मात्र अनेक घटक अजूनही ही गोष्ट गांभीर्याने घेत नाहीत. अजूनही खासगी कार्यालयातून उपस्थिती नियमांचे पालन होत नाही, विवाह समारंभ नियम तोडून सुरु आहेत, तसेच बाजारपेठांमध्ये देखील सुरक्षित अंतर, मास्क याचे पालन होताना दिसत नाही. शेवटी लोकांच्या आरोग्याचे संरक्षण करणे याला आमचे प्राधान्य आहे. त्यामुळे अतिशय कठोरपणे नियमांचे पालन करावे अन्यथा लॉकडाऊन करावं लागेल असे समजून धान्य पुरवठा, औषधी, अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सुविधा यांचे नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी मुख्य सचिवांना दिले. दरम्यान, लॉकडाऊनच्या निर्णयाला अनेक स्तरातून विरोध होऊ लागला आहे. दरम्यान, मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनीदेखील यावरून सरकारवर टीका केली."लॉकडाऊनमुळे रुग्णसंख्या कमी होतेय हे वैज्ञानिकदृष्ट्या कुठेही सिद्ध झालेलं नाही. लोकांचं जे नुकसान होईल ते सरकार भरून देणार आहे का? जर माझा नोकरी धंदा गेला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? आम्हाला बारमधून तीन लाख रुपये कमिशन येत नाही," असं म्हणत संदीप देशपांडे यांनी सरकारला टोला लगावला. जेव्हा तुम्ही कोरोनाची चाचणी करता तेव्हा तो कोणता स्ट्रेन आहे हेदेखील सिद्ध झालेलं नाही. साधा सर्दी खोकला असला तरी तो कोरोना पॉझिटिव्ह येतो. लोकं आता लॉकडाऊन मानायला तयार होणार नाहीत हे लक्षात घ्यावं. हा मुर्खपणा, आतातायीपणा सरकारनं केला तर लोकं रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत," असंही ते म्हणाले. ... तर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही"लोकांनी कोरोना विषयक नियम पाळले नाहीतर लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही," असं विधान राजेश टोपे यांनी सोमवारी केलं होतं. महाराष्ट्रात दररोज मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढत राहणे म्हणजे आपण लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल करतोय असे म्हणावे लागेल, असं राजेश टोपे म्हणाले. याशिवाय, कोरोना रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी राज्यातील निर्बंध आणखी कडक करण्यात येणार आहेत, अशी माहिती देखील राजेश टोपे यांनी दिली.ई आयसीयूवर भर - आरोग्यमंत्रीआरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील ग्रामीण भागात रुग्णांचा आणि त्यांच्या संपर्काचा शोधअधिक गतिमान करण्याची गरज व्यक्त केली.  विशेषत: छोट्या श्रांत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचं आव्हान असून ई आयसीयूवर भर देण्यासाठी पावलं उचलण्यात येतील असं सांगितलं. महाराष्ट्रातील लसीकरण देशात चांगले असून ग्रामीण भागात उपलब्ध शीत साखळी वापरून उपकेंद्रांवर लसीकरण वाढवले तर अधिक वेग मिळेल असं सांगितलं. कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्ती उशिरा रुग्णालयांत पोहचत आहेत ही चिंतेची बाब आहे. अगदी  १० ते १८ वयोगटात देखील मोठ्या प्रमाणावर संसर्ग दिसत असून पुढील काळात तरुणांमध्ये देखील मृत्यूचे प्रमाण वाढू शकते अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :MNSमनसेSandeep Deshpandeसंदीप देशपांडेUddhav Thackerayउद्धव ठाकरेRajesh Topeराजेश टोपे