शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

CoronaVirus in Maharashtra : राज्यात कोरोनाचा कहर! दिवसभरात ३५ हजार ७२६ नवे रुग्ण, १६६ जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2021 21:31 IST

CoronaVirus in Maharashtra : राज्यात आज ३५ हजार ७२६ नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर १४ हजार ५२३ रुग्णांची कोरोनावर मात केली आहे.

मुंबई : महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत विक्रमी वाढ होताना दिसत आहे. राज्यात आज ३५ हजार ७२६ नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर १४ हजार ५२३ रुग्णांची कोरोनावर मात केली आहे. (Maharashtra reports 35,726 new positive cases, 14,523 discharges and 166 deaths today)

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी राज्यात ३५ हजार ७२६ नवीन नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर, १६६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात १४ हजार ५२३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २३ लाख १४ हजार ५७९ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता तीन लाखांवर गेली आहे. 

सध्या ३ लाख ०३ हजार ४७५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,९१,९२,७५० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २६,७३,४६१ (१३.९३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १४,८८,७०१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १५,६४४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

(Coronavirus Restrictions in Maharashtra : आज मध्यरात्रीपासून राज्यात जमावबंदी; 'हे' कडक निर्बंध लागू होणार, गाईडलाईन जारी )

राज्यात रात्रीची जमावबंदीराज्यात कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता गर्दी टाळणे, वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी काही कडक उपाययोजना लागू करणे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे नाईलाजाने गरजेचे ठरत असल्याने संपूर्ण राज्यात रविवारी ( २८ मार्च ) रात्रीपासून जमावबंदी लावण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. यासंबंधीचे स्वतंत्र आदेश शुक्रवारी मदत व पुनर्वसन विभागाकडून निर्गमित व्हावेत, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्र