शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

CoronaVirus: "महाराष्ट्र सरकारकडून गोरगरिबांची उपेक्षा; उपासमारीतून होतेय चेष्टा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2020 20:08 IST

या निर्णयानुसार कार्डधारकांनी आधी त्यांना देय असणारे धान्य विकत घ्यायचे आहे, मगच त्यांना मोफत धान्य मिळू शकेल. 

 मुंबईः केंद्र सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरीब व कष्टकरी वर्गासाठी पुढील तीन महिने मोफत धान्य देण्याचा चांगला निर्णय घेतला, परंतु त्या निर्णयाची अंमलबजावणी महाराष्ट्रात अद्याप सुरू झाली नव्हती. कालच अन्न व नागरी पुरवठा विभागातर्फे याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय म्हणजे गरिबांची थट्टा व अन्न नागरी पुरवठा विभागाच्या आडमुठेपणाचा व परिस्थितीची अजिबात जाणीव नसल्याचा नमुना आहे, अशी टीका अन्न अधिकार अभियानाच्या उल्का महाजन महाजन यांनी केली आहे.या निर्णयानुसार कार्डधारकांनी आधी त्यांना देय असणारे धान्य विकत घ्यायचे आहे, मगच त्यांना मोफत धान्य मिळू शकेल. गेले पंधरा दिवस सर्व कामे ठप्प आहेत लॉकडाऊन होऊन आता एक आठवडा झाला आहे. गरीब व रोजंदारीवर जगणाऱ्यांच्या हातात अजिबात पैसे नाहीत, अशा स्थितीत लहान मुलं पाच रुपयांचा बिस्कीटचा पुडादेखील घेऊ शकत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. या परिस्थितीमध्ये विकत धान्य घ्या मगच मोफत मिळेल, अशी अट घालणे म्हणजे शासनाच्या उफराटेपणाचा व असंवेदनशीलतेचा कळस आहे. याबाबत अन्न व नागरी पुरवठा मंत्री व प्रधान सचिव यांच्या बरोबर संवाद साधला असता त्यांनी केंद्र सरकारच्या तशा सूचना असल्याचे सांगितले. परंतु वस्तुस्थिती तशी नाही. केंद्र सरकारचे आदेश तपासले असतां अशी कोणतीही अट त्यांनी घातलेली नाही. तसेच केंद्रीय योजनेप्रमाणे अन्य सर्व राज्ये मोफत धान्य देत आहेत, महाराष्ट्र सरकार स्वत: तर काही द्यायला तयार नाहीच, तेवढी दानत देखील दाखवत नाही, शिवाय केंद्र सरकारने दिलेले मोफत धान्य लोक उचलूच शकणार नाहीत, अशी अट घालत आहेत. ही निव्वळ गरिबांची क्रूर चेष्टाच आहे.मोफत धान्य दुकानदार काळ्या बाजारात विकतील ह्या भीतीपोटी हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. पण दोन रुपये/ तीन रुपयांचे धान्य देखील ते काळ्या बाजारात विकू शकतील. न्यायाचे तत्त्व असे म्हणते की, हजार अपराधी सुटले तरी चालतील, पण एका निरपराध्याला फाशी होता कामा नये. त्याप्रमाणे धान्य आधी गरिबांना मिळाले पाहिजे, एकही उपाशी माणूस राहता कामा नये, हे अंतिम ध्येय हवे. पण इथे लाखो उपाशी मेले तरी चालतील पण धान्याचा काळा बाजार होता कामा नये, असे सरकारचे आडमुठे म्हणणे आहे. काळा बाजार काही केलं तरी होऊ शकतोच कारण व्यवस्था तशीच आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या या उफराटेपणाचा व बेपर्वाईचा आम्ही निषेध करतो आणि मुख्यमंत्र्यांनी यांत लक्ष घालावे, असे आवाहन करत आहोत. तसेच स्थलांतरित व रोजंदारीवर जगणा-या अनेक कुटुंबांकडे कार्ड नाहीत, त्यांना या पॅकेजचा कसलाही फायदा होणार नाही, तेव्हा रेशनकार्ड धारकांच्या व्यतिरिक्त अन्य गरजू कुटुंबांना देखील केरळ, तेलंगणा, दिल्ली, कर्नाटक, झारखंड राज्यांप्रमाणे मोफत धान्य देण्यात यावे अशी मागणी करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शाहू महाराजांचा वारसा सांगणा-या महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील सर्वात गरीब, असुरक्षित नागरिकांच्या सुरक्षेसाठी ही किमान अपेक्षा आहे, अशी आशाही उल्का महाजन यांनी व्यक्त केली आहे.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस