मुंबई : राज्यात ३१ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला असून, राज्य सरकारने लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यासाठी मंगळवारी नवीन नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार आता राज्यात केवळ दोनच झोन, अर्थात रेड झोन आणि नॉन रेड झोन असणार आहेत. मुंबईसह पुणे, सोलापूर, नाशिक, अमरावती, मालेगाव, औरंगाबाद, धुळे, ठाणे, कल्याण-डोंबिवली, जळगाव, अकोला, अमरावती हे भाग रेड झोनमध्ये असतील. उर्वरित जिल्हे नॉन रेड झोनमध्ये असणार आहेत.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी जनतेला संबोधित करताना रेड झोन मधील निर्बंध कोणत्याही परिस्थितीत शिथिल करता येणार नाहीत, असे स्पष्ट केले होते. रेड झोनमधील शहरांची यादी जाहीर केली आहे, तर उर्वरित सर्व प्रदेश (आॅरेंज आणि ग्रीन झोनसह) नॉन रेड झोनमध्ये समाविष्ट केला आहे. शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण केंद्रे हे दोन्ही झोनमध्ये बंदच राहतील. मात्र, आॅनलाईन आणि दूरस्थ शिक्षण सेवा सुरू ठेवण्यास परवानगी असेल. तसेच हॉटेल, मॉल, प्रार्थना स्थळेदेखील राज्यभर बंद राहतील. मेट्रो रेल्वेसेवा, तसेच देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सेवा बंदच राहील. मात्र, या काळात देशांतर्गत वैद्यकीय सेवा, देशांतर्गत एअर अॅम्ब्युलन्स सेवा सुरू राहील. रेड झोनमध्ये खासगी कार्यालये पूर्णत: बंद तर शासकीय कार्यालयांत फक्त पाच टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती असेल.रेड झोनमधील निर्बंधदारुची दुकाने, आंतरजिल्हा बस वाहतूक, खाजगी बांधकाम, खाजगी कार्यालये, सलून, स्पा, टॅक्सी, आॅटोरिक्षा, कॅब, स्टेडियम या गोष्टी रेड झोनमध्ये बंद असतील. तर उर्वरित ठिकाणी चालू असतील.रेड झोनमधील निर्बंधदारुची दुकाने, आंतरजिल्हा बस वाहतूक, खाजगी बांधकाम, खाजगी कार्यालये, सलून, स्पा, टॅक्सी, आॅटोरिक्षा, कॅब, स्टेडियम या गोष्टी रेड झोनमध्ये बंद असतील. तर उर्वरित ठिकाणी चालू असतील.रेड झोनमध्येया सेवा सुरू होतील(कंटेन्मेंट भाग वगळून)- घरपोच दारू पोहोचवण्यास परवानगी- अत्यावश्यक सेवेसाठी चारचाकी वाहन (एक चालक आणि दोन प्रवासी)- दुचाकी वाहनावर एकाच व्यक्तीस परवानगी- मर्यादित एकल दुकाने, धान्य, भाजीपाला दुकाने- ई-कॉमर्सच्या माध्यमातून सर्व साहित्य मागवता येईल, कुरिअर आणि पोस्ट सेवादेखील चालू असेल, हॉटेलमधून खाद्यपदार्थ मागवण्यास परवानगी, नोंदणी कार्यालय, आरटीओ कार्यालये चालू राहतील. -आणखी वृत्त/राज्यसर्वांसाठी हे बंधनकारक- सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे, फिजिकल डिस्टंन्सचे पालन- खासगी कार्यालयांत शक्यतो ‘वर्क फ्रॉम होम’- सार्वजनिक ठिकाणी थुंकणे दंडनीय अपराध- लग्न समारंभासाठी कमाल ५० जणांची उपस्थिती- अंत्यविधीसाठी ५० पेक्षा अधिक व्यक्ती नको. कार्यालयांत थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझर बंधनकारक.
राज्यात आता दोनच झोन, नवी नियमावली जाहीर; पाहा, तुमचा जिल्हा कोणत्या झाेनमध्ये येतो?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 07:09 IST