शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

CoronaVirus Lockdown : मुंबईकर हे मूळचे कोल्हापूरकर आहेत हे विसरलात का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 7:39 PM

गेल्या आठ दिवसांत मुंबईकरांमुळे कोल्हापुरात कोरोनाची संख्या वाढली, त्यांच्यामुळेच कोल्हापूरची स्थिती बिघडली, अशी हेटाळणी करणारी भाषा सर्वच स्तरांवर वापरली जात असून, ती आपल्याच माणसामाणसांमध्ये दरी निर्माण करणारी आहे. असे ज्यांना वाटते, त्यांनी मुंबईकर हे मूळचे कोल्हापूरकर आहेत हे विसरता कामा नये. कोरोनाचे संकट आज नाही तर उद्या दूर होईल; परंतु त्यातून तयार झालेला दुरावा पुढची कित्येक वर्षे गावागावांत मतभेदाचे चटके देत राहील, याचे भान बाळगण्याची गरज आहे.

ठळक मुद्दे मुंबईकर हे मूळचे कोल्हापूरकर आहेत हे विसरलात का?समाजात दरी नको : दक्षता घ्या; परंतु हाकलून लावण्याची भाषा नको

विश्वास पाटीलकोल्हापूर : गेल्या आठ दिवसांत मुंबईकरांमुळे कोल्हापुरात कोरोनाची संख्या वाढली, त्यांच्यामुळेच कोल्हापूरची स्थिती बिघडली, अशी हेटाळणी करणारी भाषा सर्वच स्तरांवर वापरली जात असून, ती आपल्याच माणसामाणसांमध्ये दरी निर्माण करणारी आहे. असे ज्यांना वाटते, त्यांनी मुंबईकर हे मूळचे कोल्हापूरकर आहेत हे विसरता कामा नये. कोरोनाचे संकट आज नाही तर उद्या दूर होईल; परंतु त्यातून तयार झालेला दुरावा पुढची कित्येक वर्षे गावागावांत मतभेदाचे चटके देत राहील, याचे भान बाळगण्याची गरज आहे.कोल्हापुरात मूळचा स्थानिक रुग्ण एकही सापडलेला नाही. बाहेरून प्रवास करून जे आले त्यांच्यामुळेच कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यात झाला आहे हे मान्यच; परंतु जे बाहेरून म्हणजे मुख्यत: मुंबईतून आले ते काही मूळचे मुंबईचे नव्हेत. त्यांची जन्मभूमी कोल्हापूर आहे. ते आपलेच भाऊबंद आहेत. येथे पोट भरत नाही म्हणून उदरनिर्वाह शोधण्यासाठी ते मुंबईला गेले.

पंतप्रधानांनी अचानक लॉकडाऊन जाहीर केल्यावर त्यांना गावी येता आले नाही. जे अविवाहित होते ते एक बॅग घेऊन रस्त्याला लागले; परंतु जे कुटुंबासह राहतात त्यांतील बहुतांश काही ना काही उद्योग करतात. त्यामुळे सगळेच तिथे टाकून त्यांना लगेच मुंबई सोडणे शक्य नव्हते. शिवाय गावांकडूनही नाके बंद आहेत, सोडत नाहीत, तुम्ही इकडे येऊ नका असे त्यांना फोन गेले; त्यामुळे हे लोक दीड-दोन महिने तिथे अडकले. तिथे रोजगार नाही, दहा बाय दहाच्या खोलीत ४० अंश तापमान असताना राहायची पाळी त्यांच्यावर आली.

अनेकांना पोटाला काय खायचे असा प्रश्न तयार झाला. त्यानंतर सरकारने त्यांना गावी जायची परवानगी दिल्यावर हे लोक कोल्हापूरला आले आहेत. त्यांच्यापासून संसर्गाचा धोका आहे हे मान्य केले तरी आवश्यक ती दक्षता घेऊन व सर्व प्रकारच्या तपासण्या करून त्या लोकांना गावांनी आधार दिला पाहिजे. आता मुंबई पासिंगची गाडी दारात जरी नुसती थांबली तरी लोक अंगावर धावून येत आहेत. त्यांच्याकडे पाहून तोंडे वाकडी होऊ लागली आहेत.

कोरोनामुळे हा नवा जातीयवाद तयार झाला आहे. तो समाजात दुही निर्माण करणारा आहे. महापूर असो की गावांतील कोणतेही काम असो किंवा नोकरी-धंद्यासाठी तुम्ही मुंबईत गेल्यावर आजपर्यंत तुम्हांला आधार देण्याचे काम याच माणसांनी केले आहे.

आज ते अडचणीत आहेत. अशा काळात त्यांना धीर देण्याची जबाबदारी गावांची आहे. त्यांच्याकडे तपासणीचा आग्रह धरा. मंदिर, शाळांमध्ये त्यांचे विलगीकरण करा, गावांनी त्यांच्या जेवण्याखाण्याची सोय करा. महापुरात भरभरून आलेल्या मदतीच्या ट्रकची आठवण ठेवा. सोशल डिस्टन्सिंग जरूर पाळा; परंतु त्यातून सामाजिक दुरावा निर्माण होईल असे व्यवहार नकोत याची दक्षता दोन्ही पातळ्यांवर घेण्याची गरज आहे.

आम्ही पोट भरण्यासाठी मुंबईत गेलो असलो तरी मूळचे कोल्हापूरचे आहोत. आता आम्ही कुणीतरी दहशतवादी असल्यासारखा अनुभव आमच्याच गाववाल्यांकडून आम्हांला येत आहे. महापूर आला तेव्हा आठ दिवस आम्हांला मुंबईत झोप आली नाही; परंतु आता आमचेच लोक आमच्याकडे माणूस म्हणूनही बघायला तयार नाहीत, याचेच फार वाईट वाटते. हे दिवस पण जातील, हे सर्वांनी लक्षात ठेवायला हवे.- भरमू नांगनूरकरअध्यक्षयुवा एकता मंच, मुंबई

वेळ प्रत्येकावर येते. मुंबईकर बांधव रीतसर पोलीस खात्याचा पास घेऊन गावी आले आहेत. त्यांची जरूर सर्व तपासणी व्हावी; परंतु त्यांना अस्पृश्यतेची वागणूक दिली जात आहे, ती वेदनादायी आहे. गावाच्या, तालुक्याच्या कोणत्याही संकटात आम्ही आमचा भाऊ अडचणीत आहे असे समजून मदतीला धावून गेलो आणि आता आमच्यावर वेळ आल्यावर मात्र लोक बाजू काढू लागले आहेत, हे योग्य नव्हे.योगेश चव्हाण, अध्यक्ष, नवी मुंबई कोल्हापूर रहिवासी संघ, कोपरखैरणे, मुंबई

दृष्टिक्षेपात मुंबईकरकोल्हापूर जिल्ह्यात १३ मेपासून १६ हजार ७९६ लोक कोल्हापूर जिल्ह्यात आले आहेत. त्यांतील मुंबई, मुंबई उपनगरे, पालघर, रायगड, ठाणे या जिल्ह्यांतून १५ हजार १३४ लोक आले आहेत; तर पुणे व सोलापूर या रेड झोनमधील जिल्ह्यांतून १६६२ लोक आले आहेत.

आलेल्या लोकांची तालुकानिहाय संख्या अशी : आजरा- ३७८२, गडहिंग्लज- २२४३, चंदगड- १९४१, भुदरगड- १५४१, हातकणंगले- १५२०, कोल्हापूर शहर - १३८३, करवीर- ९८९, शाहूवाडी- ७९९, कागल- ७७९, शिरोळ- ७१४,राधानगरी- ६७५, पन्हाळा- ३६७ आणि गगनबावडा- ६३.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरMumbaiमुंबई