शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

coronavirus : नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरे कोरोनाविरोधातील लढाई हरले तर जिंकणार कोण?

By बाळकृष्ण परब | Updated: April 15, 2020 14:20 IST

उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी कोरोनाविरोधातील ही लढाई हरले तर काय होईल? याचा विचार कधी केलाय का?

ठळक मुद्देकोरोना विषाणूवरून आता राजकारण आणि आरोप प्रत्यारोपांनाही जोर आला आहेफेकन्यूज, अफवा पसरवल्या जात आहे. त्यातून आधीच असलेल्या संकटात नव्या समस्यांची भर पडत आहेउद्धव ठाकरे ही लढाई हरले तर राज्य हरेल आणि मोदी या लढाईत पराभूत झाले तर संपूर्ण राष्ट्र पराभूत होईल

- बाळकृष्ण परब एकीकडे राज्यात आणि देशभरामध्ये कोरोना विषाणूचे संक्रमण दिवसेंदिवस अधिकाधिक भयानक रूप घेत आहे. तर दुसरीकडे या कोरोना विषाणूवरून आता राजकारण आणि आरोप प्रत्यारोपांनाही जोर आला आहे. विशेषतः फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल मीडियावर  या आरो-प्रत्यारोपांनी अत्यंत हीन पातळी गाठली आहे. विशेषतः आपल्या महाराष्ट्रात नुकत्याच घडलेल्या काही राजकीय घडामोडींची पार्श्वभूमी ताजी असल्याने आरोप-प्रत्यारोपांची धार अधिकच तीव्र आहे. कोरोनाविरोधातील लढाईत आपला नेताच कसे कुशल नेतृत्व करतोय आणि विरोधी नेता कसा अपयशी ठरतोय, हे दाखवण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. यामध्ये सर्वच राजकीय पक्षांचे समर्थक आघाडीवर आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे समाजात विचारवंत आणि इतर जबाबदार क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीही आपल्या सोईप्रमाणे संबंधितांची तळी उचलत आहेत. त्यामुळे आधीच कोरोना विषाणूमुळे भौतिक जग दूषित झाले असताना सोशल मीडियावरचे वैचारिक जगही परस्पर द्वेषाने प्रदूषित झाले आहे. अशा परिस्थितीत आपण, आपले राज्य आणि अंतिमतः आपला देश कोरोनासारख्या महाभयंकर आपत्तीविरोधातील लढाई कशी काय जिंकणार, हा यक्षप्रश्नच आहे.

एकीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कठीण परिस्थितीत राज्याची धुरा समर्थपणे वाहत आहेत. तर मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारही कोरोनाविरोधात युद्धपातळीवर तयारी करून सज्ज झाले आहे. राज्य, देशास संपूर्ण जगावर आलेल्या या आपत्तीचा सामना करण्यासाठी आपण योग्य तो समन्वय राखून असल्याचे सांगत आहेत. मात्र या दोन्ही नेत्यांचे समर्थक मात्र एकमेकांचे सोशल मीडियावर परस्परांचे वाभाडे काढत आहेत. दावे, प्रतिदावे केले जात आहेत. प्रसंगी अनेक फेकन्यूज, अफवा पसरवल्या जात आहे. त्यातून आधीच असलेल्या संकटात नव्या समस्यांची भर पडत आहे. त्यामुळे शासन आणि प्रशासकीय यंत्रणेवर ताण येतो तो वेगळाच.

दुर्दैवाने अशा आणीबाणीच्या प्रसंगी समाजातील विचारवंत आणि इतर जबाबदार क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींनी समाज प्रबोधनाची जबाबदारी स्वीकारणे आवश्यक आहे. मात्र या मंडळींपैकी अनेकजणही सध्या राजकीय पक्षांच्या प्रवक्त्यांप्रमाणे हिसाबकिताब चुकते करण्यात गुंतले आहेत. कोरोनाविरोधात सुरू असलेली ही लढाई उद्धव ठाकरे हरावेत, असे यापैकी काही जणांना वाटते. तर कोरोनाच्या या संकटाचा सामना करण्यात नरेंद्र मोदी अपयशी ठरावेत, असे अनेकांना मनोमन वाटतेय. 

पण उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी कोरोनाविरोधातील ही लढाई हरले तर काय होईल? याचा विचार तुम्ही केलाय का? उद्धव ठाकरे ही लढाई हरले तर राज्य हरेल आणि मोदी या लढाईत पराभूत झाले तर संपूर्ण राष्ट्र पराभूत होईल आणि या दोन्हींपैकी एकही गोष्ट आपल्याला अजिबात परवडणारी नाही. त्यामुळे किमान हे संकट असेपर्यंत तरी आपापसातील मतभेद विसरा आणि एक राज्य, एक राष्ट्र म्हणून या संकटाचा सामना करा!!!

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसUddhav Thackerayउद्धव ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदी