शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
2
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
3
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
4
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
5
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
6
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
7
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
8
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
9
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
10
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
11
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
12
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
13
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
14
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
15
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
16
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
17
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
18
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
19
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
20
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!

Coronavirus: 'त्या' रुग्णांवर यापुढे थेट पोलिसी कारवाई होणार; गृहमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 4:04 PM

Coronavirus गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पोलिसांना आदेश; रुग्णालयातून पळणाऱ्या रुग्णांवर कारवाई होणार

ठळक मुद्देरुग्णालयातून पळणाऱ्या कोरोना रुग्णांवर कारवाई होणारगृहमंत्री अनिल देशमुख यांचे पोलिसांनी स्पष्ट आदेशराज्यातील अनेक ठिकाणी रुग्ण पळाल्याच्या घटना

मुंबई: कोरोनाची लागण रोखण्यासाठी एकीकडे सरकार, प्रशासन कामाला लागलं असताना दुसरीकडे कोरोनाचे रुग्ण मात्र रुग्णालयातून पळून जात आहेत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी रुग्णांनी कॉरेंटाईन होणं गरजेचं असताना उलट हे रुग्ण रुग्णालयातून बाहेर पडत आहेत. त्यामुळे इतरांच्या आरोग्याला धोका निर्माण होतोय. याच पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी थेट अशा रुग्णांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता कोरोना विलगीकरण केंद्रातून पळून जाणाऱ्या रुग्णांवर पोलिसांकडून थेट कारवाई होणार आहे.रुग्णांनी कोरोना विलगीकरण केंद्रातून पळ काढल्याच्या घटना आतापर्यंत अनेकदा घडल्या आहेत. त्यामुळे रुग्णांवरील उपचार थांबून त्यांचा जीव धोक्यात येत आहेच. याशिवाय त्यांच्या पळून जाण्यानं शेकडो लोकांना कोरोनाची बाधा होण्याचा धोकादेखील निर्माण होत आहेत. त्यामुळेच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अशा रुग्णांवर कारवाई करण्याचे अधिकार पोलिसांनी दिले आहेत. त्यांनी ट्विटमधून याबद्दलची माहिती दिलीय. 'वारंवार कोरोना विलगीकरण केंद्रातून रूग्ण पळून जाण्याचे वृत्त येत आहेत. हे त्यांच्याच नव्हे तर इतर नागरिकांच्या दृष्टीनेही धोकादायक आहे. पोलीस दलाला 'साथीचे रोग अधिनियमान्वये' अशा लोकांवर कारवाई करण्याचे निर्देश गृहमंत्रालय देत आहे', असं देशमुख यांनी ट्विटमध्ये म्हटलंय.  कोरोना विलगीकरण केंद्रातून रुग्ण पळून गेल्याच्या घटना आतापर्यंत नागपूर, पुणे, अहमदनगर यासह काही भागांमध्ये घडल्या आहेत. रुग्ण पळून गेल्यानं रुग्णालय प्रशासनाची आणि पोलिसांची तारांबळ उडते. या रुग्णांच्या माध्यमातून कोरोनाचा संस्रग होण्याची भीती असते. त्यामुळेच आता अशा रुग्णांवर थेट पोलिसी कारवाई केली जाणार आहे. तसे आदेश गृहमंत्र्यांकडून पोलिसांना देण्यात आले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस