शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
4
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
5
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
6
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
7
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
8
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
9
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
10
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
11
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
12
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
13
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
14
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
15
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
16
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
17
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
18
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
19
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
20
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...

Coronavirus : पिंपरी-चिंचवडमध्ये आढळले पाच नवे कोरोनाबाधित, राज्यातील रुग्णांची संख्या 31 वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2020 06:44 IST

Corona virus News: पिंपरी चिंचवड शहरातून दुबईला गेलेल्या तिघांचे रिपोर्ट गुरुवारी पॉझिटिव्ह आले होते. त्यातील एकाच्या कुटुंबातील चार जण आणि परदेशवारी केलेल्या एक अशा पाचजांचे रिपोर्ट आज रात्री पॉझिटिव्ह आले आहेत.

मुंबई - राज्यात कोरोना विषाणूमुळे बाधित झालेल्यांची   संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. आज दिवस अखेर राज्यात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 31 वर पोहोचली आहे. आज दिवसभरातर कोरोनाच्या 14 रुग्णांची नोंद झाली. पैकी पाच नवे रुग्ण  पिंपरी-चिंचवड या भागात आढळून आले आहेत, अशी माहिती राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने दिली. पिंपरी चिंचवड शहरातून दुबईला गेलेल्या तिघांचे रिपोर्ट गुरुवारी पॉझिटिव्ह आले होते. त्यातील एकाच्या कुटुंबातील चार जण आणि परदेशवारी केलेल्या एक अशा पाचजांचे रिपोर्ट आज रात्री पॉसझिटिव्ह आले आहेत.  कोरोना बाधित देशातून पिंपरी चिंचवड शहरात आलेल्या 31 जणांची माहिती प्रशासनाकडे आहे. या लोकांच्या कुटुंबातील आणखी संशयित 41 जणांचे नमुने एनआयव्ही कडे शुक्रवारी पाठवण्यात आले होते. त्यापैकी पाच जणांचे रिपोर्ट शनिवारी रात्री पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळाली असून, संबंधित रुग्णांना भोसरी येथील रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आले आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.आज आढळलेल्या कोरोनाच्या 14 रुग्णांपैकी 4 जण हे  पुणे येथील पहिल्या 2 बाधित रुग्णांसोबत दुबई सहलीला गेलेल्या चमूपैकी आहेत. यापैकी 1 रुग्ण अहमदनगरला, 2 यवतमाळला तर 1 जण मुंबईतील रुग्णालयात भरती आहे. तसेच, या चौघांशिवाय मुंबईत आणखी  4 जण कोरोना बाधित आढळले आहेत. यामध्ये हिंदूजा रुग्णालयात भरती असलेल्या आणि दुबईहून आलेल्या रुग्णाची पत्नी आणि मुलगा यांचा समावेश आहे. तर, मुंबईत आढळलेले इतर दोन रुग्ण हे अनुक्रमे अमेरिका व फ्रान्स आणि फिलिपाइन्सहून भारतात परतलेले आहेत. तर रात्री उशिरा पिंपरी चिंचवडमधील पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.  दरम्यान, राज्यात कोरोनाचे रुग्ण आढळल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. या राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी आणि खासगी शाळा, महाविद्यालये 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. याशिवाय, शैक्षणिक, धार्मिक, क्रीडा , राजकीय सर्व कार्यक्रमांची परवानगी रद्द करण्यात आहे. मात्र, यादरम्यान दहावीची परीक्षा सुरु राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 

मध्यरात्रीपासून सर्व प्रवासी क्वारंटाईनकेंद्र सरकारने घेतलेल्या नवीन निर्णयानुसार, आज मध्यरात्रीपासून जे प्रवासी चीन, इटली, इराण, द. कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनीमधून भारतात येतील, त्यांना १४ दिवसांकरिता क्वारंटाईन करण्यात येणार आहे. अशा एकूण चार प्रवाशांना काल क्वारंटाईन करण्यात आले. यापैकी एकाला पुण्यात विलगीकरण कक्षात भरती करण्यात आले असून, इतर तिघांना मुंबईत क्वारंटाईन करण्यात आले आहे. १४ मार्चपर्यंत मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर १,४९४ विमानांमधील १,७३,२४७ प्रवासी तपासण्यात आले आहेत. बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण ९४९ पैकी ४०९ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे.राज्यात १३१ संशयित रुग्ण भरतीराज्यात शनिवारी १३१ संशयित रुग्णांना भरती करण्यात आले आहे. सध्या १७ जण पुणे येथे, तर ७२ जण मुंबईत भरती आहेत. याशिवाय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे १६, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ येथे नऊ आणि वायसीएम रुग्णालय पिंपरी चिंचवड येथे तीन संशयित रुग्ण भरती आहेत.‘आयआयटी’चे वर्ग २९ मार्चपर्यंत बंदआयआयटी मुंबईमधील सर्व वर्ग, सेंट्रल लायब्ररी आणि प्रयोगशाळा या २९ मार्च २०२० पर्यंत आयआयटी प्रशासनाकडून पुढील निर्देश येईपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.चेंबूर, घाटकोपर येथील मॉलबाहेर शुकशुकाटकोरानामुळे मुंबईतील पूर्व उपनगरातील अनेक मॉल्सबाहेर शुकशुकाट पाहायला मिळाला. चेंबूरमधील के स्टार मॉल, क्युबिक मॉल आणि घाटकोपरमधील फिनिक्स, आर सिटी मॉल या नेहमी गजबजलेल्या मॉलमध्येही शनिवारी शुकशुकाट होता. अनेक रेस्टॉरंट, मैदाने, गार्डनबाहेरही शुकशुकाट होता.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोनाHealthआरोग्यpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड