शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

coronavirus: विदेशी गुंतवणुकदारांसाठी विशेष कृतीदलाची स्थापना, सुभाष देसाई यांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2020 05:58 IST

कोरोना संकटाच्या आर्थिक दुष्परिणामांना तोंड देण्यासाठी पुढारलेल्या देशांमध्ये विविध योजना आखल्या जात आहेत. सध्याच्या आंतराष्ट्रीय घडामोडींमुळे गुंतवणुकीसाठी पर्यायी देशांचा विचार होत आहे.

 मुंबई : कोरोना आपत्तीच्या पार्श्वभूमीवर विदेशी गुंतवणुकीच्या व्यवस्थापन आणि विस्तारासाठी राज्याच्या उद्योग विभागाने एक विशेष कृतीदलाची स्थापना केल्याची माहिती राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दिली.कोरोना संकटाच्या आर्थिक दुष्परिणामांना तोंड देण्यासाठी पुढारलेल्या देशांमध्ये विविध योजना आखल्या जात आहेत. सध्याच्या आंतराष्ट्रीय घडामोडींमुळे गुंतवणुकीसाठी पर्यायी देशांचा विचार होत आहे. यात भारताकडेही गुंतवणुकीच्या दृष्टीने समर्थ पर्याय म्हणून पाहिले जात आहे. या संधीचा लाभ घेण्यासाठी देसाई यांनी या विशेष कृतीदलाची नियुक्ती केली आहे. उद्योग विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अन्बलगन व उद्योग विभागाचे विकास आयुक्त हर्षदीप कांबळे यांचा कृतीदलात समावेश आहे.या कृती दलातील ज्येष्ठ अधिकारी सध्या गुंतवणुकदारांशी वाटाघाटी करीत आहेत. अमेरिका, इंग्लड, जर्मनी, जपान, दक्षिण कोरिया, तैवानसह अन्य देशांच्या गुंतवणुकदारांचे प्रतिनिधी सध्या राज्य सरकारच्या प्रतिनिधींसह चर्चा करीत आहेत. गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र हे आकर्षणाचे केंद्र राहावे, आलेले प्रस्ताव वेगाने अंमलात यावेत यासाठी तपशीलवार धोरण तयार करण्यात येत आहे. औद्योगिक सुरक्षेत कोणतीही तडजोड न करता अन्य प्रोत्साहने वाढवून गुंतवणूक आकर्षित करण्यावर भर देण्यात येत असल्याचे मंत्री देसाई यांनी स्पष्ट केले.महाराष्ट्राला पहिली पसंतीकोरोनामुळे चीनमधून गुंतवणूक काढण्याबाबत अनेक प्रगत राष्ट्रामंध्ये चर्चा सुरू आहे. चीनमधील गुंतवणूक इतरत्र वळविण्याचे प्रयत्न होत आहेत. भारताकडे या गुंतवणुकदारांचा ओढा असून त्यातही गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र कायमच पहिल्या पसंतीचे राज्य राहिले आहे.च्राज्यातील औद्योगिक वातावरण, उद्योगांसाठी पायाभूत सोयीसुविधा तसेच आवश्यक कुशल मनुष्यबळ महाराष्ट्रात आहे. त्यामुळे अनेक देशांचे गुंतवणूकदार वाटाघाटींसाठी तयार झाले, ही महाराष्ट्रासाठी आश्वासक बाब असल्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसEconomyअर्थव्यवस्थाInvestmentगुंतवणूकMaharashtraमहाराष्ट्र