शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

coronavirus: राज्यात सरकारकडून फेकाफेकी, आकड्यांचा घोळ; देवेंद्र फडणवीस यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2020 16:07 IST

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्य सरकारवर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे.

ठळक मुद्देराज्यात सरकारकडून आकड्यांची फेकाफेकी सुरू आहेआयसीएमआरने दिलेल्या सूचनांचे राज्य सरकारकडून पालन होत नाही आहेराज्यात अधिकारी कारभार चालवत आहेत, मात्र त्यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव आहे

मुंबई - कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे महाराष्ट्रात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवरून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपामध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्य सरकारवर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. राज्यात सरकारकडून आकड्यांची फेकाफेकी सुरू आहे, आयसीएमआरने दिलेल्या सूचनांचे राज्य सरकारकडून पालन होत नाही आहे, सर्वसामान्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, तसेच राज्यात अधिकारी कारभार चालवत आहेत, मात्र त्यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

एका वृत्तवाहिनीसोबत संवाद साधताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ज्या प्रकारे राज्यात कोरोना वाढतोय ते पाहिल्यास देशातील ४१ टक्के अॅक्टिव्ह पेशंट महाराष्ट्रात होत आहेत. तसेच देशात होणाऱ्या कोरोनाबाधितांच्या एकूण मृत्यूंपैकी ४१ टक्के महाराष्ट्रात झाले आहे. ही संख्या रोज वाढतेय. अशा परिस्थितीत राज्य सरकारकडून आकड्यांची हेरफेर सुरू आहे. काल एका दिवसांत ८ हजार जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याचे सांगण्यात आले. खरोखर रुग्ण होत असतील तर आनंदच आहेत. मात्र केवळ नंबर गेमसाठी आकड्यांचा असा खेळ करण्यापेक्षा मुंबईत लोकांना बेड्स, ऑक्सिजन आणि अॅम्ब्युलन्स मिळवण्यासाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर लोक मरत आहेत. यासंदर्भात सरकारकडून काही उपाययोजना केल्या पाहिजे होत्या.’’

तसेच आयसीएमआरकडून दिलेल्या सूचनांचे पालनही राज्य सरकारने योग्य प्रकारे केले नसल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. ते म्हणाले की, राज्यामध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होणार असे आयसीएमआरकडून त्यानंतर केंद्रीय पथकाने सांगितले होते. मात्र त्याबाबत राज्य सरकारने काय व्यवस्था केली होती. आता राज्य सरकार बेड्सची व्यवस्था केल्याचे सांगतेय मात्र हे सर्व बेड्स मिळून चार हजार आहेत. तर रुग्णांची संख्या दररोज दीड हजारने वाढत आहे. तसेच इथे वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा अभाव आहे.

अशा परिस्थितीत राजकारण करणे योग्य ठरणार नाही. त्याची ही वेळदेखील नाही. त्यामुळे अशा स्थितीत कोरोनाला रोखण्यापेक्षा सरकार आकड्यांची फेकाफेक करत असेल, बनवाबनवी करत असेल तर आम्हाला सरकारला, आरसा दाखवावा लागेल. तसेच आपल्याला कोरोनाची लढाई लढायची आहे त्यासाठी तुम्ही योग्य कारवाई, करा असे सांगावे लागेल, असे फडणवीस यांनी सांगितले.

फडणवीस पुढे म्हणाले की, आयसीएमआरच्या निर्देशांचे म्हणावे तसे पालन आपल्या राज्यात झाले नाही.  परवा राज्यातल्या एका मंत्र्याने आपण जगातील सर्वात जास्त टेस्ट केल्याचे सांगितले. मात्र महाराष्ट्रापेक्षा राजस्थान, हरियाणा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूने अधिक टेस्ट केल्या. तसेच आपल्या आजूबाजूच्या राज्यांचा विचार केल्यास महाराष्ट्रात दर दशलक्ष लोकसंख्ये मागे २५१३ चाचण्या केल्या आहेत. तर गुरजातने २४६४ आणि कर्नाटकने २४६७ चाचण्या केल्या आहेत. मात्र या राज्यांपेक्षा आपल्याकडे कोरोनाचा प्रभाव अधिक आहे. मुंबईत  १० हजार टेस्टची क्षमता असताना कमी टेस्ट केल्या जात आहेत, असा आरोपही फडणवीस यांनी केला.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

ऐकणार नसाल तर युद्धाला तयार राहा, चीनची या देशाला थेट धमकी

120 दिवस आधी रिझर्वेशन करता येणार, तात्काळ तिकीटही मिळणार; या तारखेपासून रेल्वे पूर्वीप्रमाणे सुविधा देणार

क्षेत्रफळ, लोकसंख्या, अर्थव्यवस्था आणि सैन्यक्षमता; असं आहे भारत आणि चीनचं बलाबल...  

शास्त्रज्ञांनी लावला कोरोना विषाणूला निष्क्रीय करणाऱ्या जीवाणूंचा शोध

गरज पडल्यास आमचे सैन्य लढण्यास तयार, नेपाळच्या संरक्षणमंत्र्यांची भारताला धमकी

सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा आमचा विचार नाही. पण ज्या गोष्टी करायला पाहिजे त्या गोष्टी सरकारने केल्या नाहीत. तर कुणीतर विचारलंच पाहिजे. ही बाब सरकारच्या लक्षात आणून दिली पाहिजे. उद्या समजा आकडे अचानक वाढले. तर आपल्याल पळता येईल का, म्हणूनच आपण प्रोटोकॉल पाळला पाहिजे, असेही फडणवीस पुढे म्हणाले. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबईDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडी