शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: फडणवीसांचे निकटवर्तीय आमदार कोरोना पॉझिटिव्ह; मुलालादेखील लागण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 13:38 IST

लातूरमध्ये उपचार सुरू, प्रकृती स्थिर; संपर्कात आलेल्यांना होम क्वारंटिन होण्याचं आवाहन

लातूर: राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या वेगानं वाढत आहे. गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांचं प्रमाण अतिशय झपाट्यानं वाढत असल्याचं दिसत आहे. लातूरचे भाजपा आमदार अभिमन्यु पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. आपल्याला कोरोनाची बाधा झाल्याची माहिती पवार यांनी ट्विटरवरून दिली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पवार यांनी त्यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केलं. ते फडणवीस यांचे अतिशय निकचवर्तीय म्हणून ओळखले जातात.अभिमन्यु पवार यांनी ट्विट करून त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली. त्यांच्यासोबतच त्यांच्या मुलालादेखील कोरोनाची लागण झाली. 'मला हलकासा ताप/खोकला जाणवत असल्याने मी व माझ्या कुटुंबीयांनी कोरोना चाचणी केलेली. मी व माझा मुलगा परिक्षीत आम्हा दोघांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याने आम्ही वैद्यकीय तज्ञांच्या सल्ल्यानुसार उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालो आहोत' असं पवार यांनी सांगितलं आहे. 'लातूरमधील आरोग्य व्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि म्हणूनच लातूर येथेच पुढील उपचार घेण्याचा मी निर्णय घेतला आहे. आम्हा दोघांचीही तब्येत उत्तम असून काळजीचे काहीही कारण नाही,' अशी माहिती त्यांनी दिली आहे. मागच्या ४-५ दिवसांत माझ्या वा परिक्षीतच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःला होम क्वारंटाईन करून घ्यावे तसेच खबरदारी म्हणून कोरोना चाचणीही करून घ्यावी, असं आवाहन पवार यांनी केलं आहे. दोन दिवसांत भाजपाच्या चार आमदारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. काल दिवसभरात तीन भाजपाच्या आमदारांना कोरोनाची बाधा झाली.  यातील दोन आमदार पुण्यातील आहेत. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोना झाला होता. याची माहिती त्यांनीच ट्विट करून दिली होती. यानंतर त्यांच्या घरातील ८ सदस्यांनाही कोरोना झाला होता. आता पुण्याच्या भाजपाच्या आमदार मुक्ता टिळक यांना कोरोना झाला आहे. टिळक यांच्या आईलाही कोरोनाची लागण झाल्याचे त्यांनी ट्विट केले आहे. तर भाजपचेच पुणे जिल्ह्यातील दौडचे आमदार राहुल कुल यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समजते आहे. यामुळे पुण्यात भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना कोरोनाने विळखा घातला असून महापालिकेचे अधिकारीही कोरोना बाधित झाले आहेत. पुण्यानंतर उल्हासनगरमध्ये भाजपाचे तिसरे आमदार कोरोना बाधित झाले आहेत. कुमार आयलानी यांना कोरोनाची बाधा झाली आहे. सत्ताधारी पक्षांतील दोन मंत्र्यांनाही कोरोनाची लागण झाली होती. मात्र, ते उपचारानंतर बरे झाले होते. आता विरोधी पक्षातल्या आमदारांना कोरोनाने गाठले आहे. एकाच दिवशी भाजपच्या तीन आमदारांना कोरोना; दोन पुण्यातील

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसabhimanyu pawarअभिमन्यू पवार