शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

CoronaVirus News: "पृथ्वीराज चव्हाण, देवस्थानांची संपत्ती ताब्यात घेण्याचा अधिकार तुम्हाला दिलाच कोणी?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2020 10:05 IST

CoronaVirus News: भाजपा पदाधिकाऱ्याची माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांवर टीका

मुंबई: कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. यासाठी केंद्र सरकारनं ताबडतोब देशातील सर्व देवस्थान ट्रस्टमध्ये पडून असलेले सोनं कर्जाने ताब्यात घ्यावं, असा पर्याय माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सुचवला. त्यावरुन भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक आचार्य तुषार भोसलेंनी चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली आहे. चव्हाणांचं डोकं ठिकाणावर आहे का?, असा सवाल त्यांनी विचारला आहे. आचार्य तुषार भोसलेंनी चव्हाण आणि काँग्रेसवर शरसंधान साधत सरकारला देवस्थानांचं सोनं ताब्यात घेण्याचा अधिकार नसल्याचं म्हटलं आहे. 'पृथ्वीराज चव्हाण, देवस्थानं खासगी मिळकत आहे का? त्यांच्या संपत्तीला ताब्यात घेण्याचा अधिकार तुम्हाला दिलाच कोणी? ज्यावेळी देवस्थानांना काही देण्याची वेळ होती तुम्ही मुख्यमंत्री होतात तेव्हा, तेव्हा तुमच्या हाताला लकवा मारला होता आणि देवस्थानांकडे संपत्ती मागण्यासाठी तेच हात पुढे करताना लाज वाटत नाही? एवढीच जर तुम्हाला सरकारची काळजी आहे, तर तुम्ही ज्यांची हुजरेगिरी करता त्या तुमच्या नेत्यांना सांगा. सोनिया गांधींना सांगा त्यांची संपत्ती सरकारला द्यायला. त्यांचा जावई रॉबर्ट वाड्रांना सांगा. पी. चिदंबरमला सांगा. सुरेश कलमाडीला सांगा. सामान्य जनतेच्या कष्टाचा पैसा त्यांनी घरात पुरुन ठेवला, त्यातला रुपया देण्याची त्यांची नियत नाही आणि लोकांनी श्रद्धेनं देवस्थानांना, मंदिरांना दान दिलेली संपत्ती तुम्ही ताब्यात घ्यायला सांगता? तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा अधिकार नाही,' अशा शब्दांत भोसले माजी मुख्यमंत्र्यांवर बरसले.कोरोनाचा सामना करण्यासाठी पैसा कसा उभा करायचा, त्याची काळजी पंतप्रधान नरेंद्र मोदी घेतील, असंदेखील भोसलेंनी म्हटलं आहे. 'या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी सक्षम आहेत. त्यांनी २० लाख कोटींचं पॅकेज देशासाठी जाहीर केलंय आणि कमी पडलं तर अजूनही ते जाहीर करतील आणि तो पैसा कसा आणायचा यासाठीही ते सक्षम असतील. तुमच्या सल्ल्याची गरज नाही. कारण तुम्हाला तुमच्या पक्षातही कुठलंही स्थान उरलेलं नाही आणि सरकारमध्येही कुठलंही स्थान उरलेलं नाही, म्हणून तुम्ही अशी विधान करत आहात. पण एक गोष्टी कान उघडून ऐका. या आमच्या देवस्थानांना मुघलांनी लुटलं, इंग्रजांनी लुटलं. पण आता आमच्या देवस्थानांना लुटण्याची नियत तुमच्यासारख्या नेत्यांची आणि काँग्रेस पक्षाची असेल, तर हे कदापि शक्य होणार नाही. हा देश आदरणीय पंतप्रधानांच्या हातात अतिशय सुरक्षित आहे,' असं भोसले म्हणाले. चव्हाण यांनी त्यांचं विधान ताबडतोड मागे घ्यावं, अशी मागणी त्यांनी केली. 

काय म्हणाले आहेत पृथ्वीराज चव्हाण?केंद्र सरकारनं ताबडतोब देशातील सर्व देवस्थान ट्रस्टमध्ये पडून असलेले सोने कर्जानं ताब्यात घ्यावे. वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलच्याअंदाजानुसार देशात १ ट्रिलियन डॉलर (किंवा ७६ लाख कोटी रुपये) इतकं सोनं आहे. सरकारनं हे सोने १ किंवा २ टक्के व्याजानं परतीच्या बोलीवर ताब्यात घ्यावं, अशी सूचना पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ही सूचना करताना, चव्हाण यांनी पीएमओ कार्यालयास मेन्शन केलं आहे. गिलगिट आणि बाल्टिस्तानमधील षडयंत्राविरोधात उतरला भारत; पाकला दिला कडक इशारा..तर तीन महिने पगार न मिळालेल्या ‘त्या’ 11 कोटी लोकांना कोणता लाभ होणार?

‘स्वावलंबी भारत’चा दुसरा टप्पा :शेतकरी, मजुरांसाठी ३.१६ लाख कोटी

कमी आयात आणि जास्त निर्यात हाच देशाच्या समृद्धीचा मार्ग!, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

एअर इंडियाची १९ मे ते २ जूनदरम्यान विमानसेवा, अडकून पडलेल्यांना दिलासा

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणNarendra Modiनरेंद्र मोदी