शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
2
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
4
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
5
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
6
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
7
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
8
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
9
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
10
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
11
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
12
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
13
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
14
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
15
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
16
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
17
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
18
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
19
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
20
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...

VIDEO: पुण्यात अजित पवार कसे फेल गेले हे दाखवण्याचा प्रयत्न होतोय; चंद्रकांत पाटील यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2020 22:32 IST

CoronaVirus News: महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर पाटील यांची जोरदार टीका

पुणे: पुण्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे.पुण्यात अजित पवार कसे अपयशी ठरले आहेत, हे दाखवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. राज्यातलं सरकार पाडण्याचा आमचा  कोणताही प्रयत्न नसल्याचा त्यानं पुनरुच्चार केला.  पुण्यातील कोरोनाच्या परिस्थितीवरून चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर टीका केली. त्यांचा रोख मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर होता. 'पुण्यात अजित पवार कसे फेल ठरले आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी पुण्याबद्दल एकही बैठक घेतली नाही. त्यांना पुण्याची किती काळजी आहे? त्यांनी सगळं अजित पवारांवर सोडून दिलं आहे, अशा शब्दांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. सरकारनं पुणे महानगरपालिकेला काहीही दिलेलं नाही, असंदेखील पाटील म्हणाले.पुण्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना काही सूचना केल्या. चाचण्यांची संख्या, ऑक्सिजन बेड्स, आयसीयूंची संख्या वाढवण्याची मागणी त्यांनी केली. फडणवीस प्रत्येक भागाचा आढावा घेऊन मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहितात. मात्र त्याचं पुढे काहीच होत नाही. अजित पवार स्वत:च्या जिल्ह्यात फेल गेले, हे दाखवण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र या राजकारणाचा फटका पुणेकरांना बसत असल्याचं पाटील यांनी म्हटलं.महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस नेते आणि मंत्री अशोक चव्हाण नाराज असल्याची चर्चा आहे. त्यावरही पाटील यांनी भाष्य केलं. उभं बजेट कापल्यावर अशोक चव्हाणांना राग येणारच ना, असा टोला पाटील यांनी लगावला. आम्ही सरकार पाडणार याचाही त्यांनी पुनरुच्चार केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना खासदार संजय राऊत कारण नसताना सरकार पाडण्याबद्दलची विधानं करत आहेत. आपल्या कार्यकर्त्यांना आत्मविश्वास देण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत, असं पाटील म्हणाले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchandrakant patilचंद्रकांत पाटीलUddhav Thackerayउद्धव ठाकरेAjit Pawarअजित पवार