शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : कोरोनावर मात करण्यासाठी जनसंपर्क टाळणे हाच उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2020 22:00 IST

समूहाने एकत्र येणे टाळण्यातच हित

ठळक मुद्देकोरोनाची प्रसारसाखळी तोडावी 

पुणे : जगभरातील १७७हून अधिक देशांमध्ये कोरोनाचा फैलाव झाला. देशातील २२ राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. दक्षिण कोरियासारखे आपण प्रत्येक जण कोरोना चाचणी का करीत नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. भारतासारख्या १३५ कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या आणि भौगोलिक विविधता असलेल्या देशामध्ये कोरोनाची साखळी तोडण्यासाठी संपूर्ण बंद हाच पर्याय असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. दक्षिण कोरियामध्ये एका महिलेने कोरोना चाचणी करण्यास नकार दिला होता. त्यानंतर पुढे त्या महिलेला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. तसेच, तिच्यामुळे तब्बल १६० नागरिकांना बाधा झाल्याचेदेखील उघड झाले. भारतामधील बहुतांश प्रकरणांमधे परदेशातून आलेल्या व्यक्तीच्या संपर्कामध्ये आल्यामुळेच कोरोनाची बाधा झाल्याचे रुग्ण अधिक आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात केरळ आणि दिल्लीमधून आलेले रुग्ण परदेशातून आलेलेच होते. जयपूरमधे इटलीतून आलेल्या पर्यटकामुळे १७ जणांना बाधा झाली. आगºयामधील काही प्रकरणांमधे रुग्ण परदेशी गेले नव्हते. तसेच, त्यांचा बाधित व्यक्तींशी थेट संबंधदेखील आला नव्हता. त्यानंतरही त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. आग्रा येथे २ जण इटलीहून आले होते. त्यांच्यामुळे परिवार बाधित झाला. महाराष्ट्रातील बहुतांश प्रकरणामध्ये परदेशवारी करून आलेल्या व्यक्तींच्या संपर्कामध्ये आल्यानेच बाधा झाल्याची संख्या अधिक आहे. देशामध्ये महाराष्ट्र, केरळ, दिल्ली, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि लडाखमध्ये रुग्णांची संख्या दुहेरी आहे. जगामधे सर्वाधिक ८० हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची संख्या चीनमधे असून, खालोखाल इटलीमधे ४८ हजार रुग्ण आहेत. स्पेन, जर्मनी, अमेरिका, इराण या देशांमधे वीस हजारांहून अधिक रुग्ण आहेत. फ्रान्स आणि दक्षिण कोरियामधे रुग्णांची संख्या दहा ते बारा हजार आहे. भारतातील रुग्णांची संख्यादेखील पावणेतीनशेच्या वर गेली आहे. त्यात सातत्याने वाढ नोंदविण्यात येत आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार दक्षिण कोरियाने लाखो लोकांची चाचणी केली. तसेच, प्रत्येक रुग्णाची माहिती ठेवली जात आहे. सर्वाधिक उद्रेक झालेल्या चीन, इटली या देशांनी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जनसंपर्क तोडण्यावरच भर दिला. चीनमधील हुबेई हा प्रांत तब्बल ५० दिवस बंद होता. सर्व नागरिकांना स्वत:ला घरात कोंडून घेतले होते. अमेरिकेने देखील तेच पाऊल उचलले असून, सर्व कार्यालये बंद केली आहेत. त्यामुळे जनसंपर्क टाळणे हेच त्यावरील प्रभावी अस्त्र आहे. 000

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPublic Transportसार्वजनिक वाहतूकdoctorडॉक्टर