शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
4
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
5
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
6
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
7
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
8
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
9
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
10
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
11
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
12
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
13
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
14
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
15
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
16
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
17
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
18
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
20
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

Coronavirus : छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी निमित्त वढू बुद्रुक व तुळापूर येथे होणारे सर्व कार्यक्रम रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2020 19:50 IST

येत्या २४ मार्च रोजी वढु बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिन

ठळक मुद्देछत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळ दर्शन ३१ मार्चपर्यंत बंदश्री क्षेत्र वढू बुद्रुक व तुळापूर ग्रामपंचायत , स्मृती समिती , ग्रामस्थ निर्णय

कोरेगाव भिमा /लोणीकंद : छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त येत्या २४ मार्च रोजी वढु बुद्रुक व तुळापुर येथील आयोजित सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यासह पुणे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी जिल्ह्यातील विविध मंदिरे बंद , तसेच यात्रा, उत्सव, उरूस यांसारखे कार्यक्रम रद्द करण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देतवढू बुद्रुक व तुळापूर येथील कार्यक्रम तसेच छत्रपती संभाजी महाराजांचे समाधीस्थळाचे दर्शनही ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासन,ग्रामस्थ, उत्सव समिती यांच्या वतीने घेण्यात आला आहे.      श्री क्षेत्र वढू बुद्रुक व तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त शंभूराजांना मानवंदना देण्यासाठी दरवर्षी महाराष्ट्रासह विविध राज्यातुन अलोट गर्दी जमते. यात नाशिक, श्रीगोंदा व पुण्यातुन मोठ्या प्रमाणात शक्तिज्योतींचे आगमन होत असते. दुपारी शंभूराजांच्या समाधीवर व पूर्णाकृती पुतळ्यावर हेलिकॉप्टरव्दारे होणारी पुष्पवृष्टी व पोलीस दलामार्फत देण्यात येणारी शासकीय मानवंदना सोहळा दरवर्षी आयोजित करण्यात येतो. त्यावेळी मोठ्या प्रमाणात शंभूभक्त उपस्थित असतात.         कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात सर्व सभा, मेळावे, सामाजिक कार्यक्रम, जत्रा, उरूस, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, नाट्यगृहे तसेच आदी गर्दीच्या ठिकाणांवर बंदी घालण्यात आलेली आहे. येत्या २४ मार्च रोजी वढु बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त लाखो शंभूभक्त  येथे येण्याची शक्यता असल्याने कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सदर पुण्यतिथी कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय ग्रामपंचायत , धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज स्मृती समिती व ग्रामस्थांच्या वतीने घेण्यात आला असल्याची माहिती सरपंच रेखा शिवले यांनी दिली आहे, यावेळी पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार, सरपंच रेखा शिवले यांच्यासह उपसरपंच रमेश शिवले, माजी उपसरपंच संतोष शिवले , ग्रामपंचायत सदस्य सचिन भंडारे , धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज स्मृती समितीचे अध्यक्ष सोमनाथ भंडारे, शांताराम भंडारे, पोलीस पाटील जयसिंग भंडारे, पोलीस नाईक ब्रम्हा पोवार व ग्रामस्थ उपस्थित होते. त्याचबरोबर ३१ मार्च २०२० पर्यंत छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ दर्शनासाठीही बंद करण्यात आले असल्याचे सरपंच रेखा शिवले यांनी सांगितले आहे.................तुळापूर येथील सर्व कार्यक्रम रद्द  छत्रपती संभाजी महाराज याचा फाल्गुन वद्य आमावश्या मंगळवार दि. २४ मार्च रोजी होणारा श्री क्षेत्र तुळापूर येथील पुण्यतिथी चे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे . श्री क्षेत्र तुळापूर (ता.हवेली)येथे धर्मवीर संभाजी महाराज याचे स्फूर्तिस्थळ असून दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील ३३२ वी पुण्यतिथी बलिदान स्मरण दिन म्हणून साजरा करण्यात येणार होती. मात्र, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी  येत्या २४ मार्च रोजी होणाºया पुण्यतिथीचे कार्यक्रमांचे सर्व नियोजन ग्रामस्थांच्या वतीने झाले होते. परंतु, आज मंगळवारी ( दि. १७) सरपंच रुपेश शिवले यांनी पत्रक प्रसिद्ध करुन क जिल्हाधिकारी तसेच जिल्हा प्रशासन निर्देशानुसार श्री क्षेत्र तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराज यांची ३३२ वी पुण्यतिथी निमित्ताने होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे असल्याचे जाहीर केले आहे.   गेले महिनाभर माजी  सरपंच गणेश पुजारी, उपसरपंच राहुल राऊत,  ज्ञानेश्वर शिवले , संतोष शिवले, अमोल शिवले, राजाराम शिवले , नवनाथ शिवले , संजय चव्हाण आणि ग्रामस्थ तयारी करत होते.  धर्मवीर संभाजी महाराज पालखी सोहळा समितीचे अध्यक्ष संदिपअप्पा भोंडवे म्हणाले कोरोनाचा प्रादूर्भाव , शासन निर्णय व पालखी सोहळा समिती यांच्याशी या बाबत चर्चा करण्यात आली .      छ. संभाजी महाराज बलिदान स्मरण दिनानिमित्ताने किल्ले पुरंदर येथुन पालखी सोहळा येणार होता. मात्र, तो संपूर्ण सोहळा रद्द करण्यात आला आहे. सकाळी मुक पदयात्रा सालाबादप्रमाणे निघणार असून त्यात मोजकेच कार्यकर्ते सहभागी होणार आहे. सरपंच रुपेश शिवले यांनी सांगितले, छ. संभाजी महाराज याची येत्या २४ मार्च रोजी पुण्यतिथी फक्त ग्रामपंचायत पदाधिकारी विधीवत पूजा अभिषेक करुन अभिवादन करतील. लोणीकंद पोलीस निरीक्षक प्रताप मानकर म्हणाले, कोरोना व्हायरसच्या भीतीने राज्यभर खबरदारी घेतली जात आहे. पुण्यतिथी निमित्तानें श्री क्षेत्र तुळापूर व परिसरात कुठलेही कार्यक्रम होणार नाही. पोलिस यंत्रणा सज्ज आहे. नागरिकानी बाहेर न पडता सहकार्य करावे.दरम्यान परिसरातील सर्व जिल्हा परिषद शाळा , माध्यमिक विद्यालय व महाविद्यालये सुट्टी देण्यात आली आहे.  

टॅग्स :PuneपुणेBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारLoni Kandलोणी कंदSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीNavalkishor Ramनवलकिशोर रामCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस