CoronaVirus News: चिंताजनक! कोरोनाचा धोका वाढला; कालच्या दिवसातला 'तो' आकडा काळजी वाढवणारा ठरला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2020 07:23 IST2020-08-14T03:49:57+5:302020-08-14T07:23:39+5:30
एकूण बाधित साडेपाच लाखांहून अधिक

CoronaVirus News: चिंताजनक! कोरोनाचा धोका वाढला; कालच्या दिवसातला 'तो' आकडा काळजी वाढवणारा ठरला
मुंबई : एकीकडे राज्यात कोरोनाची स्थिती नियंत्रणात येत असताना पुन्हा एकदा दिवसभरात झालेल्या मृत्यूंचा आलेख वाढताना दिसत आहे. राज्यात गुरुवारी कोरोनाचे ४१३ बळी गेले. कोरोनामुळे दिवसभरात नोंदविलेले आतापर्यंतचे हे सर्वाधिक बळी आहेत. तर दिवसभरात ११,८१३ रुग्णांची नोंद झाली. परिणामी, एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५ लाख ६० हजार १२६ झाली असून मृतांचा आकडा १९,०६३ झाला आहे.
राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६९.८ टक्क्यांवर आले असून मृत्युदर ३.४ टक्के आहे. १ लाख ४९ हजार ७९८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दिवसभरात नोंद झालेल्या ४१३ मृत्यूंमध्ये मुंबई ४८, ठाणे १३, ठाणे मनपा ९, नवी मुंबई मनपा ९, कल्याण-डोंबिवली मनपा १३, उल्हासनगर मनपा ८, भिवंडी-निजामपूर मनपा ८, मीरा-भाईंदर मनपा ५, पालघर २, वसई-विरार मनपा १०, रायगड ९, पनवेल मनपा ६, नाशिक ५, नाशिक मनपा ८, मालेगाव मनपा १, अहमदनगर ३, अहमदनगर मनपा ५, धुळे ३, धुळे मनपा २, जळगाव १२, जळगाव मनपा ३, नंदुरबार १, पुणे २५, पुणे मनपा ४८, पिंपरी-चिंचवड मनपा १९, सोलापूर ५, सोलापूर मनपा १, सातारा २०, कोल्हापूर २२, कोल्हापूर मनपा १४, सांगली ३, सांगली-मिरज-कुपवाड मनपा ७, सिंधुदुर्ग १, रत्नागिरी २ आदी रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, राज्यात ३ लाख ९० हजार ९५८ रुग्ण कोविडमुक्त झाले.