शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

Coronavirus :बुलडाण्यातील 138 गावांनी कोरोनाच्या दोन्ही लाटा रोखल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 09:51 IST

Coronavirus In Maharashtra: पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात तब्बल साडेसहा पट रुग्ण वाढलेले असतानाही, दोन्ही लाटांदरम्यान आपली वेस सुरक्षित ठेवण्यात या गावांनी यश मिळवले.

- नीलेश जोशीबुलडाणा : कोरोनापासून बचावासाठीच्या त्रिसूत्रीचे अत्यंत काटेकोर पालन करीत बुलडाणा जिल्ह्यातील १३८ गावांनी कोरोनाची पहिली व दुसरीही लाट थोपविण्याची किमया साधली आहे. विशेष म्हणजे पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात तब्बल साडेसहा पट रुग्ण वाढलेले असतानाही, दोन्ही लाटांदरम्यान आपली वेस सुरक्षित ठेवण्यात या गावांनी यश मिळवले. त्यामुळे या गावांच्या यशाचे नेमके गमक शोधून त्याचा ‘पॅटर्न’ विकसित होण्याची गरज आहे.१४ महिन्यांच्या अविरत परिश्रमांनंतर दुसरी लाट ओसरण्यास सुरुवात झालेली दिसते. प्रशासकीय यंत्रणा काहीशी थकलेली असली तरी, तिसरी लाट थोपविण्यासाठी पुन्हा जोरकस प्रयत्न करीत आहे. पहिल्या लाटेत जिल्ह्यात १२ हजार २१७ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. दुसऱ्या लाटेत हाच आकडा वाढून ८२ हजार ३३६ च्या घरात गेला. संसर्गाची व्याप्ती वाढून बाधितांच्या जवळून संपर्कातील व्यक्तींचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात व्यस्त असलेल्या प्रशासकीय यंत्रणेने तब्बल १४ लाख ८२ हजार नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. या गावांनी जाणीवपूर्वक किंवा आपसूकच आचरणात आणलेली जीवनपद्धती व आपल्या दैनंदिन व्यवहारावर घातलेल्या मर्यादांचा महसूल, आरोग्य आणि ग्रामविकास विभागातील अधिकाऱ्यांनी अभ्यास केल्यास, त्याचा तिसऱ्या लाटेचा मुकाबला करताना उपयोग होऊ शकतो. या गावांनी प्रशासनाने दिलेल्या त्रिसूत्रीचे प्रामाणिकपणे पालन केल्यामुळेच ही गावे आज या संसर्गापासून दूर असल्याचे जिल्हा परिषदेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. ४ तालुक्यांतील गावांचे योगदान बुलडाणा जिल्ह्यात प्रामुख्याने दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संग्रामपूर, जळगाव जामोद या दोन तालुक्यांतील ५४ गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखले. कोरोनाला दोन्ही लाटांमध्ये थोपविणाऱ्या १३८ गावांपैकी तब्बल ४० टक्के गावे या दोन तालुक्यांतील आहेत. त्यापाठोपाठ खामगाव तालुक्यातील १६ आणि मेहकर तालुक्यातील १२ गावांचा समावेश आहे. जिल्ह्यातील १४१९ गावांपैकी १,२८१ गावांना जे जमले नाही, ते या दहा टक्के गावांनी प्रत्यक्षात उतरविले आहे.‘पॅटर्न’चा अभ्यास कराया १३८ गावांचे सर्वेक्षण करून त्यांचा ‘पॅटर्न’ निर्माण करण्याची गरज बोलून दाखवण्यात येत आहे. त्यादृष्टीने पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आणि जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी केली. मात्र, सर्वेक्षणासाठी जाणाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी करून नंतरच त्यांना पाठवावे, असे ते म्हणाले.

असे रोखले कोरोनाला...- या गावांतील जनसमुदायाने संक्रमित शहरी तथा ग्रामीण भागातील काही मोठ्या गावांपासून स्वत:ला दूर ठेवले.- यातील बहुतेक गावे दुर्गम भागातील असल्याने गावकऱ्यांनी शहरी भागात जाणे जाणीवपूर्वक टाळले.- कोणी बाहेरून गावात आल्यास त्यांना सक्तीने दूर शेतात विलगीकरणामध्ये ठेवण्यात आले.

उद्रेकापासून ही गावे दूरकोरोनाच्या उद्रेकापासून ही १३७ गावे दूर आहेत. यातील काही गावे दुर्गम भागात आहेत. आतापर्यंत कोरोनाला रोखण्यात या गावांना यश येणे, ही समाधानाची बाब आहे- भाग्यश्री विसपुते, सीईओ, जिल्हा परिषदयांनी लाटा थोपविल्या : बुलडाणा ९, चिखली ९, लोणार ९, शेगाव ३, देऊळगाव राजा ३, सिंदखेड राजा ३, मेहकर १२, खामगाव १६, नांदुरा ६,संग्रामपूर २९, जळगाव जामोद २५, मोताळा ६, मलकापूर ८.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसbuldhanaबुलडाणा