शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
2
"काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
3
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
4
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
5
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
6
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
7
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
8
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
9
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
10
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
11
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
12
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
13
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
14
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
15
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
16
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
17
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
18
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

CoronaVirus News: राज्यात ११ लाख ३४ हजार रुग्ण कोविडमुक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2020 4:04 AM

CoronaVirus in Maharashtra: राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७९.३ झाले असून, मृत्युदर २.६४ टक्के

मुंबई : राज्यात दिवसभरात कोरोनाचे १६ हजार ८३५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आतापर्यंत ११ लाख ३४ हजार ४५५ रुग्ण कोविडमुक्त झाले. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७९.३ झाले असून, मृत्युदर २.६४ टक्के आहे.राज्यात शनिवारी १४ हजार ३४८ रुग्ण आणि २७८ मृत्यूंची नोंद झाली आहे. परिणामी, राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या १४ लाख ३० हजार ८६१ झाली असून, बळींचा आकडा ३७ हजार ७५८ वर पोहोचला आहे.दिवसभरात नोंदविलेल्या २७८ मृत्यूंमध्ये मुंबई ४६, ठाणे २, ठाणे मनपा १३, नवी मुंबई मनपा ५, कल्याण-डोंबिवली मनपा १०, भिवंडी-निजामपूर मनपा १, मीरा-भार्इंदर मनपा ४, पालघर ३, वसई-विरार मनपा २, रायगड २, पनवेल मनपा ६ आदी रुग्णांचा समावेश आहे. सध्या राज्यात २२ लाख ३ हजार ९६६ व्यक्ती घरगुती अलगीकरणात, तर २८ हजार ४१४ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत.मुंबईत कोरोनाचे ९ हजारांहून अधिक बळीमुंबई : मागील सहा महिन्यांत मुंबईत कोरोनाचे तब्बल ९ हजारांहून अधिक बळी गेले. शहर-उपनगरात दिवसभरात कोरोनाच्या २ हजार ४०२ रुग्णांचे निदान झाले असून, ४६ मृत्यू झाले. परिणामी, कोरोनाबाधितांची संख्या २ लाख १२ हजार ४६२ झाली असून, मृतांचा आकडा ९ हजार ६० आहे.आतापर्यंत मुंबईतील १ लाख ७३ हजार ६७० रुग्ण कोविडमुक्त झाले असून, सध्या २९ हजार ३१४ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर ८२ टक्क्यांवर आला असून, रुग्णदुपटीचा कालावधी ६४ दिवसांवर गेला आहे. २६ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर १.०९ टक्के नोंदविण्यात आला. तर, शुक्रवारपर्यंत ११ लाख ५७ हजार ३९ कोविडच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.सध्या मुंबईत चाळ व झोपडपट्टीत ६७४ सक्रिय कंटेनमेंट झोन्स आहेत. सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या ९ हजार २८० इतकी आहे. मागील २४ तासांत पालिकेने रुग्णांच्या सहवासातील १९ हजार ९७६ अतिजोखमीच्या व्यक्तींचा शोध घेतला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या