शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

राज्य राखीव पोलीस दलात कोरोनाचा शिरकाव; ३ जण पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2020 18:55 IST

मुंबई पोलिसांच्या मदतीला पुण्यातील राज्य राखीव पोलीस दलाच्या गट क्रमांक २ ची एक कंपनीत बंदोबस्तासाठी गेली होती.

ठळक मुद्देतिघे जण पॉझिटिव्ह आढळल्याने या जवानांमध्ये व त्यांच्या नातेवाईकांमध्ये भीती निर्माण

पुणे :  पुण्यातील राज्य राखीव पोलीस दलाच्या गट क्रमांक २ मध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे. मुंबईला बंदोबस्तांसाठी गेलेल्या एका कंपनीतील तिघे जवान पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांच्यासह सर्व कंपनीला पुण्यात क्वारंटाईन करण्यात आले आहे. मुंबईतील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. 

मुंबई पोलिसांच्या मदतीला पुण्यातील राज्य राखीव पोलीस दलाच्या गट क्रमांक २ ची एक कंपनीत बंदोबस्तासाठी गेली होती. या कंपनीतील १०० जवान तीन दिवसांपूर्वी पुण्यात परत आले. या सर्वांना प्रशासनाने वेगळे ठेवले आहे. त्यातील तिघांना थंडी, ताप जाणवल्याने त्यांची तपासणी केली असता त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे आढळून आले आहे.  त्यामुळे आता पुन्हा सर्व जवानांची तपासणी शुक्रवारी करण्यात येणार आहे. या सर्व जवानांना रामटेकडी येथील गट क्रमांक २ च्या अलंकरण हॉलमध्ये ठेवण्यात आले आहे. तसेच महापालिकेच्या एका शाळेमध्ये त्यांना विलगीकरण करुन ठेवले आहे. त्या ठिकाणी गैरसोय असल्याच्या तक्रारी या त्यांच्या नातेवाईकांकडे करीत आहे. त्यात बुधवारी त्यातील तिघे जण पॉझिटिव्ह आढळल्याने या जवानांमध्ये व त्यांच्या नातेवाईकांमध्ये भीती निर्माण झाली आहे़.याबाबत राज्य राखीव पोलीस दलाच्या गट क्रमांक २ चे सहायक समादेशक लक्ष्मण उत्तेकर यांनी सांगितले की, मुंबईमध्ये बंदोबस्तासाठी गेलेली एक कंपनी २० एप्रिल रोजी दुपारी पुण्यात परत आली. या सर्वांची पुण्यात आल्या आल्या त्यांच्या ३ टीम तयार करुन वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. त्यांची राहण्याची सोय २ मोठ्या हॉलमध्ये करण्यात आली आहे. त्या ठिकाणी सर्वसुविधा आहेत. ८ टॉयलेट आहेत. तसेच मोठ्या मंडपात एकावेळी १० जण अंघोळ करु शकतील अशी सोय आहे. तसेच  महापालिकेची एक शाळा घेण्यात आली असून तेथे काहीजणांची सोय केली आहे. आतापर्यंत गेल्या तीन दिवसात त्यांची तीन वेळा तपासणी केली गेली आहे. त्यात सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. काल तिघा जणांना थंडी, ताप वाजत असल्याने त्यांच्यात लक्षणे दिसू लागल्याने त्यांची चाचणी केली असता ते कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे. त्यांना वेगळे करुन उपचार सुरु करण्यात आले आहे. या सर्व जवानांची शुक्रवारी पुन्हा तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक प्लॅटूनमधील २० जणांची एक टीम तयार करुन त्यांना कोंढव्यातील हॉस्पिटलमध्ये नेण्यात येणार आहे़ तेथे त्यांची तपासणी होणार आहे़.

...........

मुंबईला बंदोबस्तासाठी गेलेले तिघे जवान पॉझिटिव्ह

सर्व जवान सोशल डिस्टन्सिंग पाळत आहे ना यावर देखरेख असते. त्यांनी काय काळजी घ्यावी, याच्या सूचना दिल्या आहेत. ते एकत्र गप्पा मारत बसू नये म्हणून परिसरात बंदोबस्त ठेवला आहे. तसेच सर्व जवानांकडून सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत योगा करुन घेतला जातो. त्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविल्या जात असल्याचे उत्तेकर यांनी सांगितले.

.............

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिसhospitalहॉस्पिटल