शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Corona virus : कोरोनाला हरवायचंय... मग हे वाचाच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2020 17:04 IST

कोरोनाविषयी विषयी अफवा आणि सल्ले, टिकटॉक व्हिडिओ, रॅप सॉन्ग, बरेच काही प्रकार तुम्हाला सोशल मीडियावर पाहायला मिळतील .

ठळक मुद्दे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेली माहिती प्रश्नोत्तर स्वरूपात

पुणे - कोरोना विषाणू संदर्भात लोकांमध्ये अजूनही बरेच समज-गैरसमज आहेत. कोणताही शास्त्रीय आधार नसलेल्या माहितीवर लोक सहजपणे विश्वास ठेवत आहेत. त्यास सोशल मीडिया मोठया प्रमाणावर कारणीभूत आहे. त्यावर येणाऱ्या माहितीवर लोक लगेच विश्वास ठेवून कसलीही खातरजमा न करता पुढे पाठवत आहेत. सध्याच्या परिस्थितीत लोकांपर्यंत योग्य माहिती पोहचणे आवश्यक आहे. त्यासाठी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेली माहिती प्रश्नोत्तर स्वरूपात देत आहोत. 

प्रश्न - नोव्हेल कोरोना व्हायरस म्हणजे  काय?उत्तर - नोव्हेल कोरोना हा एक विषाणू (व्हायरस) आहे, जो सर्वात पहिल्यांदा चीन  देशाच्या वुहान येथे आढळला. याला नोव्हेल म्हणण्यात येते कारण हा विषाणू पहिल्यांदाच आढळला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या विषाणूमुळे होणा?्या आजाराला 'कोविड १९' हे नाव दिले आहे.

प्रश्न - कोरोना विषाणूचा स्रोत (मूळ) काय आहे?उत्तर - सध्यातरी या विषाणूच्या संसगार्चा खात्रीशीर स्त्रोत कळालेला नाही. कोरोना विषाणू ही विषाणूंचे एक मोठे कुटुंब आहे,  काहींमुळे लोक आजारी पडतात आणि काही प्राण्यांमध्ये पसरतात. सुरुवातीला चीनच्या वुहान येथे पसरलेल्या या साथीमधील लोकांचा सागरी अन्न आणि प्राणी बाजाराशी संबंध आला होता, अशी नोंद आहे.

प्रश्न - कोविड १९ आजाराची प्राथमिक लक्षणे कोणती आहेत?उत्तर - आतापर्यंत या आजाराचा रुग्णांमध्ये दिसून आलेली लक्षणे म्हणजे ताप, खोकला आणि श्वासोछ्वास करण्यास होणारा त्रास, अशी आहेत.

प्रश्न - हा विषाणू कसा पसरतो?उत्तर - हा एक नवा विषाणू असल्यामुळे नेमका कशा-कशामुळे प्रसार होतो हे स्पष्ट नाही. सुरुवातीला कदाचीत प्राण्यापासून पसरलेला हा विषाणू आता व्यक्ती संपकार्तून पसरताना दिसतो आहे. असा तर्क आहे की इतर साथीच्या आजाराप्रमाणे एखादी विषाणू प्रभावित व्यक्ती जेव्हा शिंकते किंवा खोकते तेव्हा याचा प्रसार होतो.

प्रश्न - या आजाराला रोखण्यासाठी लस उपलब्ध आहे का?उत्तर - अद्याप नाही. आजपर्यंत, हा विषाणू रोखण्यासाठी किंवा उपचार करण्यासाठी कोणत्याही लसीचा शोध लागला नाही.

प्रश्न - यावर कोणते उपचार आहेत?उत्तर - या विषाणूच्या प्रादुभार्वावार सध्यातरी कोणताही उपचार उपलब्ध नाही. लक्षनांनुसार औषधें दिली जातात.

प्रश्न - स्वत:ला सुरक्षित कसे ठेवता येईल?उत्तर - या विषाणूचा इलाज करण्यासाठी सध्यातरी कोणतीही लस उपलब्ध नाही. या विषाणूला शरिरात प्रवेश करू न देणे हा सर्वोत्तम उपचार आहे. तसेच वैयक्तीक स्वच्छतेचे पालन करा, सतत साबणाने हात धुण्याची सवय ठेवा, शिंकताना व खोकताना तोंड झाका, प्रवास करणे टाळा.

प्रश्न - कोरोनाग्रस्त व्यक्तीशी संपर्क आल्यास काय करायला हवे?उत्तर - संपर्क आल्यापासून किमान १४ दिवस स्वत:ला इतरांपासून विलग ठेवा. आपल्या तब्येतीकडे काटेकोरपणे लक्ष द्या. खालील शारिरीक लक्षणांचे निरिक्षण करा. ताप, खोकला, श्वसनास त्रास किंवा श्वास कमी पडणे.वरीलपैकी लक्षणे दिसल्यास पुढिल उपचार व सुविधांसाठी जवळच्या आरोग्य सुविधा सेवेशी संपर्क करा. बाधित व्यक्तीशी आलेल्या संपकार्बाबत पूर्ण माहिती द्या.

प्रश्न -  तपासणी कोणी करुन घ्यायला हवी?उत्तर - जर तुम्हाला ताप, खोकला किंवा श्वासोच्छ्वास करायला त्रास होत असेल, तर तुम्ही लगेच वैद्यकीय मदत घ्यायला हवी. डॉक्टर, तपासणी करुन आणि चीन किंवा इतर कोरोना व्हायरस प्रभावित देशाशी किंवा व्यक्तीशी तुमचा आलेला संपर्क याचा तपशील घेऊन सांगतील की तुम्हाला तपासणीची गरज आहे की नाही.

टॅग्स :PuneपुणेCentral Governmentकेंद्र सरकारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSocial Mediaसोशल मीडिया