शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : भारतीयांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाचवेल का कोरोनापासून?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2020 17:59 IST

त्यामुळेच कदाचित आपल्याकडे या विषाणूपासूनचा मृत्यूदर कमी राहत असावा...

ठळक मुद्देवैद्यक व्यावसायिकांत चर्चा: अभ्यास व संशोधनाची व्यक्त होते आहे गरज

पुणे: जगण्याच्या लढाईत तिन्ही त्रिकाळ वेगवेगळ्या समस्यांना निधड्या छातीने तोंड देणाऱ्या भारतीयांना आजार काही नवे नाहीत. त्यांचा हा निर्धार गुणसुत्रांमधलाच असला तर कोरोना विषाणूंवरही ते यशस्वी मात करतील अशी चर्चा वैद्यक क्षेत्रातील जाणकारांमध्ये कोरोना आपत्तीच्या पार्श्वभूमीवर सुरू आहे. त्याचाच वेध काही तज्ञ डॉक्टरांबरोबर बोलून घेतला असता त्यांनी यावर अधिक अभ्यास व संशोधन होण्याची गरज व्यक्त केली. प्रत्येक व्यक्तीची गुणसूत्रे वेगवेगळी असतात, मात्र त्यातही प्रदेश, वातावरण, वंश अशा काही गोष्टींचा कणमात्र का होईना एक भाग असतोच, भारतीयांमधील हा भाग या लढाईत कदाचित ऊपयोगी पडू शकतो असा एक अंदाज यातून व्यक्त होताना दिसतो आहे.पँथॉलाजिस्ट(एम.डी.) डॉ. मंदार परांजपे यासंबधी बोलताना म्हणाले,"जगात सर्वत्र या विषाणूने थैमान घातले आहे. भारतातही तो पोहचलाच आहे. मानवी शरीरात रक्तामध्ये लाल व पांढर्या पेशी असतात. त्यातील पांढर्या पेशी बाहेरून शरीरात आलेल्या विषाणूंबरोबर लढण्याचे काम करतात. पांढऱ्या पेशी लढत असताना कधीकधी त्यातून घातक असे सायटोकाईन स्टॉर्म निर्माण होते.  त्यात 'आयएल6' हे एक प्रकारचे रसायन निर्माण होते. सायटोकाईन स्टॉर्म हे रुग्णासाठी प्राणघातक ठरू शकते. सायकोकाईन स्टॉर्म निर्माण होण्याची संभाव्यता ही पांढऱ्या पेशीवर असलेल्या विशिष्ट ह्यूमन ल्यूकोसाईट अँन्टीजेननुसार ठरते."डॉ. परांजपे पुढे म्हणाले, " भारतीयांच्या पांढऱ्या पेशींवर जे विशिष्ट  ह्यूमन ल्युकोसाईट अँन्टीजेन जास्त प्रमाणात आहेत, त्यांच्यामुळे सायटोकाईन स्टॉर्मची संभाव्यता कमी होत असावी आणि त्यामुळेच कदाचित आपल्याकडे या विषाणूपासूनचा मृत्यूदर कमी राहत असावा असा एक आशावादी शास्त्रीय अंदाज व्यक्त होतो आहे. पण अजून हे संशोधनाद्वारे सिद्ध झाले नसल्यामुळे आपण अजिबात गाफील राहून चालणार नाही. आवश्यक ती सर्व काळजी ही आपण घेतलीच पाहिजे."डॉ. अनंत फडके हेही वैद्यक क्षेत्रातील नावाजलेले तज्ञ आहेत. ते म्हणाले" या मुद्द्यावर चर्चा सुरू आहे हे बरोबर आहे, मात्र ती प्राथमिक स्तरावर आहे. हा विषाणू नवा आहे, त्याची लक्षणे नवी आहेत. भारतीयांची रोग प्रतिकार शक्ती अन्य लोकसमूहांपेक्षा निश्चितच चांगली आहे. पण या नव्या विषाणूच्या आजारासमोर ती कसा व.किती टिकाव धरेल यावर अभ्यास व अधिक संशोधन होण्याची गरज आहे. तसा अभ्यास व संशोधन सुरूही असेल किंवा आहे. त्यातून पुढे काही शास्त्रीय कसोटीवर सिद्ध झाले तरच यावर खात्रीपूर्वक बोलता येईल.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसIndiaभारतdoctorडॉक्टरResearchसंशोधनHealthआरोग्य