CoronaVirus in Maharashtra: ...ही कोरोनाची तिसरी लाट तर नाही ना! ठाकरे सरकारच्या मंत्र्यांना 'मोठी' शंका
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2021 14:22 IST2021-05-11T14:22:09+5:302021-05-11T14:22:50+5:30
Corona Virus in Maharashtra: देशात कोरोनाची तिसरी लाट ही ऑगस्टच्या आसपास येणार असल्याची शक्यता विविध तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. मात्र, यशोमती ठाकूर यांनी आता ज्या लाटेने राज्यात थैमान घातले आहे तीच तिसरी लाट तर नाही ना अशी शंका व्यक्त केली आहे.

CoronaVirus in Maharashtra: ...ही कोरोनाची तिसरी लाट तर नाही ना! ठाकरे सरकारच्या मंत्र्यांना 'मोठी' शंका
देशभरात कोरोनाची दुसरी लाट (Corona Second Wave) मोठ्या प्रमाणावर विध्वंस करत असताना या लाटेत सर्वाधिक प्रभावित झालेल्या महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन (Lockdown in Maharashtra) लावल्याने हळूहळू कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होऊ लागली आहे. मुंबईमध्ये तर काल हजारापेक्षा कमी रुग्ण सापडले आहेत. असे असले तरीही राज्याचा ग्रामीण भाग मोठ्या प्रमाणावर कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. (Yashomati Thakur doubts on Corona Second Wave in Maharashtra Rural Area.)
या परिस्थितीवर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी मोठी शंका उपस्थित केली आहे. देशात कोरोनाची तिसरी लाट ही ऑगस्टच्या आसपास येणार असल्याची शक्यता विविध तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. मात्र, यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी आता ज्या लाटेने राज्यात थैमान घातले आहे तीच तिसरी लाट तर नाही ना अशी शंका व्यक्त केली आहे.
आम्हाला अशी शंका आहे की, ही तिसरी लाट तर नाही ना. कारण ग्रामीण भागात जास्त प्रादुर्भाव होत आहे. ग्रामीण भागातून अनेक रुग्ण सापडू लागले आहेत. दक्षता घेण्याची गरज आहे. जिल्हा यंत्रणेने जागोजागी, गावेगावी कन्टेनन्मेंट झोन तयार केलेले आहेत. सगळ्यांना विनंती करताहेत की काळजी घ्या, तरीही काही लोकं ऐकत नाहीएत, अशी खंत वाटत आहे, असे त्या म्हणाल्या.