corona virus : राज्यातील कोरोना मृत्यूचे होणार ऑडिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 12:14 PM2020-10-10T12:14:57+5:302020-10-10T12:16:46+5:30

कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांत कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या मोठी आहे. याची दखल घेत मंत्रिमंडळाच्या बैठकीत याची चर्चा झाली आहे. प्रामुख्याने या तीन जिल्ह्यांसह राज्यातील कोरोना मृत्यूचे ऑडिट होणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

corona virus: State corona death to be audited | corona virus : राज्यातील कोरोना मृत्यूचे होणार ऑडिट

corona virus : राज्यातील कोरोना मृत्यूचे होणार ऑडिट

Next
ठळक मुद्देराज्यातील कोरोना मृत्यूचे होणार ऑडिटकोल्हापूर, सांगली, साताऱ्यातील वाढत्या मृत्युदरामुळे झाला निर्णय

कोल्हापूर : कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांत कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या मोठी आहे. याची दखल घेत मंत्रिमंडळाच्या बैठकीत याची चर्चा झाली आहे. प्रामुख्याने या तीन जिल्ह्यांसह राज्यातील कोरोना मृत्यूचे ऑडिट होणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

मुश्रीफ म्हणाले, या तीन जिल्ह्यांत कोरोनाचा मृत्युदर जास्त आहे. त्यामुळे याची दखल मंत्रिमंडळाने घेतली. त्यानुसार प्रामुख्याने या तीन जिल्ह्यांसह राज्यातील कोरोना मृत्यूचे ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला. हे सर्वजण कोरोनामुळेच मृत्यू पावले आहेत की त्यांना आधी काही आजार होते? डॉक्टरांचा हलगर्जीपणा नडला का? संबंधित रुग्णाला दाखल कधी केले, त्याच्यावर कोणकोणते उपचार केले, औषधे, इंजेक्शन्स कुठली दिली, या सर्व बाबींचे हे ऑडिट असेल. त्यातून मग नेमके कोरोनामुळेच कितीजण मृत्यू पावले याचा नेमका आकडा समोर येईल.

राज्यभरात अनेक कोरोनायोद्ध्यांनी उत्कृष्ट काम केले आहे. मात्र त्यातील अनेकजणांचे काम प्रकाशात आलेले नाही. अशांचा जिल्हा परिषदांच्या वतीने सत्कार करण्याचा मानस असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

५० लाखांऐवजी अनुकंपा तत्त्वावर नोकरी

कोरोनाच्या काळात कर्तव्यावर असताना ज्या शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे, अशांना ५० लाख देण्याऐवजी त्यांच्या घरातील एकाला शासकीय नोकरीत अनुकंपा तत्त्वावर घ्यावे, असा प्रस्ताव मांडल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

Web Title: corona virus: State corona death to be audited

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.