शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

Corona virus : खासगी डॉक्टरांना गुन्हेगाराप्रमाणे वागणूक देऊ नये : आयएमएचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2020 08:28 IST

लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर दवाखान्यांमधील कर्मचारी कामावर येत असताना त्यांच्यापैकी अनेकांना पोलिसांचा लाठीमार खावा लागला.

ठळक मुद्देडॉ. अविनाश भोंडवे : शासनाने निवेदन काढून कर्मचाऱ्यांना कामावर येण्याबाबत आश्वस्त करावे

पुणे :  खासगी डॉक्टर दवाखाने बंद ठेवत आहेत, असे विधान सरकारकडून केले जात आहे. राज्यात सुमारे तीन लाख डॉक्टर आहेत. त्यापैकी १०-२० टक्के डॉक्टरांनीच दवाखाने बंद ठेवले आहेत. मात्र, त्यामागील वास्तव समजून न घेता त्यांची नोंदणी रद्द करण्याच्या नोटिसा प्रशासनाकडून काढण्यात आल्या आहेत. खाजगी डॉक्टरांना गुन्हेगाराप्रमाणे वागणूक देऊ नये, असे आवाहन इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे करण्यात आले आहे. आयएमएचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी याबाबतची माहिती दिली.आपण दवाखाना बंद ठेवल्यास आपल्याला एपिडेमिक अ‍ॅक्ट १८९७अन्वये गंभीर शिक्षा होऊ शकते आणि आपली मेडिकल कौन्सिलमधील नोंदणी रद्द केली जाईल, अशी नोटीस महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांकडून आयएमएच्या राज्यातील सर्व २१२ शाखांना,डॉक्टरांना आणि रुग्णालयांना मिळाल्या आहेत. याबाबत डॉ. भोंडवे म्हणाले, एन-९५ मास्क उपलब्ध नसल्याने कापडी किंवा सर्जिकल मास्क घालून डॉक्टर रुग्णांना तपासत आहेत. अशा स्थितीत डॉक्टरना संसर्ग होण्याचा धोका वाढतो आहे. डॉक्टर दररोज ४ रुग्ण तपासत असतील तर त्यांच्यापर्यंत हा संसर्ग पोहोचू शकतो. कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी दवाखाने सुरु ठेवा, असे सांगितले जात आहे.  मात्र, त्यातून साथ आटोक्यात न येता पसरण्याची शक्यता जास्त आहे आणि डॉक्टरांनाही धोका आहे.

लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर दवाखान्यांमधील कर्मचारी कामावर येत असताना त्यांच्यापैकी अनेकांना पोलिसांचा लाठीमार खावा लागला. त्या भीतीमुळे कर्मचारी आता कामावर यायला तयार नाहीत, त्यांच्याशी पुरेशी सुरक्षित साधने उपलब्ध नाहीत. दुरून येणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रवासाची साधने उपलब्ध नाहीत. दवाखान्यांच्या वेळा लक्षात घेऊन त्या वेळेत काही बस सोडाव्यात, अशी आम्ही मागणी केली होती आणि ती मान्य करण्यात आली. प्रत्यक्षात, ती अंमलात आणली गेली नाही. शासनाने निवेदन काढून कर्मचाऱ्यांना कामावर येण्याबाबत आश्वस्त करावे, त्यांना सोयी उपलब्ध करुन दयाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

अनेक दवाखान्यांच्या जागा भाडेतत्वावर घेतलेल्या असतात. कोरोनाच्या भीतीने संबंधित जागामालकांनी किंवा सोसायटीतील लोकांनी दवाखाने बंद करण्याची किंवा जागा सोडून जाण्याची सक्ती केली आहे. सरकारने याबद्दल कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्याबाबतही कारवाई झालेली नाही किंवा नोटीसही देण्यात आलेली नाही, याकडेही डॉ. भोंडवे यांनी लक्ष वेधले. 

टॅग्स :Puneपुणेdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटलCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस