शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

Corona virus : काहींसाठीच ‘हायड्रॉक्सी क्लोरोक्वीन’; विपरीत परिणामाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2020 13:02 IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड  ट्रम्प यांनीही या गोळ्यांची भारताकडे मागणी केली आहे. त्यामुळे या गोळ्या पुन्हा चर्चेत आल्या आहेत.

ठळक मुद्देविनाकारण किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नका.. संधीवाताच्या रुग्णांसाठी किंवा मलेरियामध्ये अँटीव्हायरल म्हणून ‘हायड्रॉक्सी क्लोरोक्वीन’

पुणे : भारतात कोरोनाबाधित रुग्ण, त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर, परिचारिकांना ‘हायड्रॉक्सी क्लोरोक्वीन ’ या प्रतिबंधात्मक गोळ्या देण्यास सुरुवात झाली आहे. आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड  ट्रम्प यांनीही या गोळ्यांची भारताकडे मागणी केली आहे. त्यामुळे या गोळ्या पुन्हा चर्चेत आल्या आहेत. पण या गोळ्या भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) निश्चित केलेल्या घटकांसाठीच उपलब्ध आहेत. तसेच अन्न व औषध प्रशासनानेही या गोळ्यांनी औषध दुकानांमधून विक्री करण्यास बंधने घातली आहेत. विनाकारण किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय या गोळ्या घेतल्यास विपरीत परिणामही होऊ शकतात.भारतात संधीवाताच्या रुग्णांसाठी किंवा मलेरियामध्ये अँटीव्हायरल म्हणून ‘हायड्रॉक्सी क्लोरोक्वीन’ या गोळ्यांचा वापर केला जातो.@‘आयसीएमआर’च्या म्हणण्यानुसार, ही गोळी कोरोना विषाणूचा प्रभाव कमी करण्यासाठीही परिणामकारक आहे. मात्र, या गोळीचा वापर ठरावीक लोकांनीच करण्याबाबतही नियमावली करण्यात आली आहे. सुरुवातीला या गोळीच्या वापराबाबत सोशल मीडियावर माहिती येऊ लागल्यानंतर लोकांकडून मागणी वाढली. कोणताही वैद्यकीय सल्ला न घेता काहींनी या गोळ्यांचा वापर केला. त्याचा विपरीत परिणाम झाल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. त्यामुळे या गोळ्यांच्या खुल्या विक्रीवर बंधने घातली. अन्न व औषध प्रशासनाकडून या गोळ्यांच्या विक्रीवर लक्ष ठेवले जात आहे. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय ही गोळी द्यायची नाही, अशा सक्त सूचना आहेत. त्यामुळे सध्या बहुतेक औषध विक्रेत्यांकडे या गोळ्यांची मागणी तुलनेने कमी झाली आहे.‘आयसीएमआर’ नियमावलीनुसार, कोरोनाबाधित किंवा संशयित रुग्णावर उपचार करणारे डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचारी तसेच कोरोनाबाधित रुग्णाच्या जवळच्या संपर्कातील लक्षणे नसलेल्या व्यक्तींना या गोळ्या द्यायला हव्यात.  या गोळ्यांचे डोसही निश्चित केले आहेत. अधिकचे डोस झाल्यास संबंधितांना त्रासही होऊ शकतो. तर १५ वर्षांखालील मुलांना या गोळ्या देऊ नयेत, असेही स्पष्ट केले आहे. नायडू व अन्य रुग्णालयातील डॉक्टर व अन्य कर्मचाºयांना या गोळ्या देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. तसेच रुग्णांनाही या गोळ्या दिल्या जात आहेत. ही गोळी केवळ प्रतिबंधात्मक म्हणून वापरण्यास परवानगी दिलेली आहे. ........कोरोनासाठी हायड्रॉक्सी क्लोरोक्वीन ही गोळी वापरण्यास परवानगी दिल्यानंतर लोकांनी खरेदीसाठी गर्दी केली. अनेकांनी कोणताही सल्ला न देता गोळ्या खाल्या. त्यांना त्याचा त्रासही सहन करावा लागला. जास्त गोळ्या खाल्यास लिव्हर व किडनीवर परिणाम होऊ शकतो. जास्त डोस घेतल्यास मलेरियासारख्या आजाराला प्रतिकार करण्याची शक्तीही कमी होईल, अशी भीती आहे. त्यामुळे लोकांनी या गोळीसाठी आग्रह करू नये.- डॉ. अविनाश भोंडवे,अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र शाखा.............हायड्रॉक्सी क्लोरोक्वीन या गोळ्यांच्या विक्रीवर बंधने घालण्यात आली आहे. एमबीबीएस किंवा त्यावरील डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय गोळ्या दिल्या जात नाहीत. त्यामुळे सध्या दुकानांमध्ये पुरेशी उपलब्धता आहे. रुग्णालयांशी संलग्न औषध दुकानांना प्राधान्य दिले जात आहे. सध्या कोरोनाबाधित किंवा संपर्कातील लोकांनाच गोळ्या दिल्या जात असल्याने मागील काही दिवसांत या गोळ्यांची मागणीही नाही.- सुशील शहा, अध्यक्ष, केमिस्ट असोसिएशन आॅफ पुणे डिस्ट्रिक्ट......... 

 

टॅग्स :PuneपुणेMedicalवैद्यकीयdoctorडॉक्टरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस