शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
6
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
7
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
8
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
9
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
10
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
11
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
12
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
13
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
14
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
15
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
16
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
17
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
18
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
19
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
20
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश

Coronavirus: मतदारसंघातला कोरोना जयंत पाटलांच्या टप्प्याबाहेर; रोजचे अडीचशे ते तीनशे कोरोनाबाधित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2021 11:32 IST

Corona virus in Islampur: वाळवा तालुक्यात रोज सरासरी अडीचशे ते तीनशे कोरोनाबाधित आढळून येत आहेत. यांच्यावर उपचारासाठी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात पुरेशी शासकीय यंत्रणा नाही.

- अशोक पाटील

इस्लामपूर : पालकमंत्री जयंत पाटील (Jayant patil) यांनी इस्लामपुरात वारंवार बैठका घेऊन कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी कडक कारवाईचे आदेश दिले होते, परंतु प्रशासनाच्या ढिलाईमुळे वाळवा तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या (Corona Virus patient) वाढतच चालली आहे. शासकीय कोविड केंद्रे भरली आहेत, तर खासगी रुग्णालये मनमानी करीत आहेत, त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये उपचाराबाबत भय निर्माण झाले आहे. (NCP state president Jayant Patil's Islampur in trouble; corona patient increased on daily basis.)

वाळवा तालुक्यात रोज सरासरी अडीचशे ते तीनशे कोरोनाबाधित आढळून येत आहेत. यांच्यावर उपचारासाठी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात पुरेशी शासकीय यंत्रणा नाही. त्यामुळे खासगी कोविड रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे. तेथे भरमसाट बिल आकारले जात असल्याने सर्वसामान्यांमध्ये उपचाराबाबत भय निर्माण झाले आहे.  त्यामुळे बहुतांशी रुग्ण घरातच उपचार घेत आहेत. परिणामी रुग्णाच्या घरात आणि  परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. आरोग्य खात्याकडून मोठ्या प्रमाणात रॅपिड ॲटिजन चाचण्या केल्या जात आहेत, परंतु कोरोनाबाधित रुग्णांवर तातडीने उपचार केले जात नाहीत. बहुतांशी रुग्ण खासगी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार घेत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्याचे आव्हान आरोग्य यंत्रणेपुढे आहे.

सध्या लग्नाचे मुहूर्त आहेत. लग्नकार्यात गर्दी होत आहे. लॉकडाऊन असले तरी बाजारपेठेतून सर्व  साहित्य उपलब्ध होत असल्याने शहरातील रस्त्यांवर गर्दी दिसत आहे. यावर नगरपालिका, पोलीस आणि शासकीय यंत्रणेचे नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. पालकमंत्री जयंत पाटील यांनी फक्त आढावा बैठक घ्यायची, त्यानंतर कारवाईला वाटाण्याच्या अक्षता लावायच्या, असा प्रकार सुरू आहे. यामुळे वाळवा तालुक्यातील कोरोनाचा कहर कमी होत नसल्याचे दिसत आहे.

प्रशासकीय यंत्रणेत ढिलाईजयंत पाटील यांच्याकडे जलसंपदा विभाग, जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद या जबाबदाऱ्या असल्याने स्वत:च्या मतदारसंघासाठी त्यांच्याकडे कमी वेळ आहे. ते येथे येऊन गेल्यानंतर प्रशासकीय यंत्रणेच्या कारभारात ढिलाई येत आहे.  त्यामुळे वाळवा तालुक्यात कोरोनाचा कहर वाढत आहे.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या