शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus :कोरोनाचे कारण देत आणीबाणी विरोधकांचे मानधन बंद करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2020 15:55 IST

राज्यातील ३ हजार व देशातील सुमारे ८ हजार वयोवृद्ध व प्रामुख्याने गरजू कार्यकर्त्यांंना या निर्णयाचा फटका बसणार आहे. पु

ठळक मुद्देपुण्यातील कार्यकर्ते, नेते यांचा या निर्णयाला विरोध

राजू इनामदार-पुणे: आणीबाणीच्या विरोधकांना मागील दोन वर्षांपासून दिले जात असणारे मानधन रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. २३ जूलै रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. राज्यातील ३ हजार व देशातील सुमारे ८ हजार वयोवृद्ध व प्रामुख्याने गरजू कार्यकर्त्यांंना या निर्णयाचा फटका बसणार आहे.पुण्यातील कार्यकर्ते, नेते यांनी या निर्णयाला विरोध दर्शवला आहे.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्याच्या कर व करेतर महसुलात मोठी घट झाली आहे. अर्थव्यवस्थेवर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. त्यावर प्रभावी उपाययोजना करण्याच्या मोहिमेत आणीबाणी विरोधकांचे मानधन रद्द करण्याचा निर्णय झाला असल्याचे यासंबधीच्या सरकारी निर्णयात म्हटले आहे. या निर्णयापुर्वी ज्यांचे मानधन प्रलंबित आहे ते अदा करण्यात येऊन नंतर योजना बंद करण्यात यावी असे राज्याच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कळवण्यात आले आहे. यावर्षीचे फेब्रुवारीपासूनचे मानधन कोणालाच अदा करण्यात आलेले नाही.

सन २०१८ पासून हे मानधन देण्यात येत होते. दरमहा १० हजार रूपये व संबंधित पात्र व्यक्तीचे निधन झाल्यास त्याच्या पत्नीला ५ हजार रूपये याप्रमाणे हे मानधन मिळत होते. त्याचा अनेक वृद्ध कार्यकर्त्यांना फायदा होत होता.

मानधन थकल्याचे सांगण्यासाठी भेट घ्यायला आलेल्या काही वृद्ध कार्यकर्त्यांंना उपमुख्यमंत्री अजित पवार यांंनी हे सरकार काही दात कोरून पोट भरणारे सरकार नाही, त्यामुळे काळजी करू नका, मानधन मिळेल व त्यात वाढही होईल असे आश्वासन दिले होते. त्यानंतर हा मानधन रद्द करण्याचा निर्णय झाला आहे हे विशेष!सन १९७५ मध्ये तत्कालीन काँग्रेस सरकारने आणीबाणी लादली होती. काँग्रेस वगळता आणीबाणीला देशभरात सर्वपक्षीय विरोध झाला. त्यावेळी हजारो कार्यकर्ते, नेते यांना मिसाखाली अटक करून तुरूंगात डांबले गेले. त्यावेळी वयाने २० किंवा त्यापुढे असणार्या बहुतेक कार्यकर्ते, नेते यांचे वय आता सत्तरी पार आहे. १९ महिन्यांचा तुरूंगवास झालेल्यांना या योजनेत पात्र समजण्यात येत होते. असे एकूण ३ हजारजण राज्यात आहेत. त्यांच्यातील ही केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, खासदार गिरीश बापट, माजी आमदार कुमार सप्तर्षी यांच्यासारख्या २५ टक्के जणांंनी मानधन नाकारले आहे. उर्वरितपैकी अनेकांची आजची स्थिती अतिशय हलाखीची असून हे मानधन त्यांना दिलासा देणारे होते. मात्र त्यावरही आता संक्रात आली आहे. (३०८)

टॅग्स :PuneपुणेState Governmentराज्य सरकारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस