शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
2
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
6
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
7
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
8
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
9
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
10
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
11
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
12
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
13
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
14
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
15
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
16
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
17
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
18
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
19
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
20
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'

Corona virus : कोरोनाविरोधात एकवटणार शासकीय आणि खासगी वैद्यकीय यंत्रणा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 3:09 PM

राज्यावर साथीच्या आजाराचे संकट कोसळले असताना त्यावर मात करण्यासाठी एकत्रित प्रयत्न गरजेचे असल्याच्या मुद्द्यावर या बैठकीत एकमत...

ठळक मुद्देआरोग्यमंत्री आणि आयएमए पदाधिकारी यांच्या बैठकीत विविध निर्णयांवर शिक्कामोर्तब राज्यस्तरीय समन्वय समितीआयएमएतर्फे जिल्हास्तरीय समित्यांची नेमणूक केली जाणार प्रतिबंधात्मक उपाय,डॉक्टरांची भूमिका, जनतेमध्ये जनजागृती याबाबत चर्चा आणि कार्यवाही

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना करण्यासाठी शासकीय आणि खाजगी यंत्रणा आता हातात हात घेऊन काम करणार आहेत. शासकीय पदाधिकारी आणि आयएमचा राज्याचा टास्क फोर्स यांची एकत्रित राज्यस्तरीय समनव्य समिती स्थापन केली जाणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि इंडियन मेडिकल कौन्सिलचे राज्याचे प्रतिनिधी यांच्यात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बुधवारी (८ एप्रिल) आरोग्मंत्री राजेश टोपे यांच्यासह बैठक पार पडली. डॉ. अविनाश भोंडवे, डॉ. मंगेश पाटे आणि डॉ. रवी वानखेडकर हे आयएमएचे प्रतिनिधी म्हणून व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये सहभागी झाले होते. राज्यावर साथीच्या आजाराचे संकट कोसळले असताना त्यावर मात करण्यासाठी एकत्रित प्रयत्न गरजेचे असल्याच्या मुद्द्यावर या बैठकीत एकमत झाले.याबाबत 'लोकमत'शी बोलताना डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, 'आयएमएतर्फे जिल्हास्तरीय समित्यांची नेमणूक केली जाणार आहे.  यामध्ये कोव्हिडची साथ रोखण्यासाठी आवश्यक असलेले प्रतिबंधात्मक उपाय,डॉक्टरांची भूमिका, जनतेमध्ये जनजागृती याबाबत चर्चा आणि कार्यवाही केली जाणार आहे. स्थानिक शाखेचे अध्यक्ष आणि सचिवांचा या समितीत समावेश असेल.आयएमएतर्फे मोठ्या शहरांमध्ये २५ कम्युनिटी क्लिनिक सुरू केली जातील. छोटी शहरे आणि तालुक्यांमध्ये १०० रक्षक दवाखान्यांचा समावेश असेल. ज्या शहरामध्ये नागरिकांना घराबाहेर पडणे शक्य नाही, अशा ठिकाणी आयएमएची ५० मोबाईल क्लिनिक कार्यरत असतील. कोव्हिड रुग्णांसाठी असलेल्या हाय डिपेंडन्सी सेंटरमध्ये आयएमएचे सदस्य स्वयंस्फुतीर्ने काम पाहतील. साथीच्या आजारादरम्यान आपल्या अनुभवाचा जास्तीत जास्त उपयोग ते वैद्यकीय क्षेत्राला करून देतील, असे विविध निर्णय यावेळी घेण्यात आले.डॉकटरांच्या सुरक्षेला आयएमएने कायमच प्राधान्य दिले आहे. कोरोनाच्या काळातही कोरोनाबाधित आणि संशयित व्यक्तींवर उपचार करताना डॉकटर आणि इतर कर्मचा?्यांना पीपीई किट, सेफ्टी गिअर आवश्यक असून, अधिकृत उत्पादकानी अनुदानित किमतीमध्ये ही उपकरणे पुरवावीत, अशी मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. राज्य सरकारने मान्यता दिलेले अधिकृत उत्पादक आणि विक्रेते यांची यादी आयएमएला दिली जाणार आहे.डॉक्टरांविरोधातील हिंसाचारासाठी कायद्यामध्येही सुधारणा सुचवण्यात आली असून, हल्ला करणा?्यांना ३ ते ७ वर्षांची शिक्षा सुनावली जावी, अशी मागणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, कोरोनाशी सबंधित काम करताना मृत्यू झाल्यास डॉक्टरांच्या वारसाला १ कोटी रुपयांची भरपाई मिळावी, मेडिको-लीगल इम्युनिटीचा विचार व्हावा, अशा विविध मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली.

टॅग्स :Puneपुणेdoctorडॉक्टरRajesh Topeराजेश टोपेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMedicalवैद्यकीय