शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
7
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
8
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
9
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
10
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
11
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
12
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
13
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
15
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
16
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
17
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
18
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
19
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
20
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली

Corona virus: कोरोनाबाधित 373 रुग्ण अत्यवस्थ; ८० टक्के रुग्णांमध्ये लक्षणे नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2021 05:24 IST

Corona virus: मुंबईत मार्च २०२० पासून कोरोनाचा प्रसार सुरू झाला. आतापर्यंत ३ लाख २७ हजार ६१९ बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी तीन लाख पाच हजार ६३९ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाचा प्रसार गेल्या महिन्यापासून वाढू लागल्यानंतर सक्रिय रुग्णांचा आकडा ९,६३३ वर पोहोचला आहे. यापैकी ८० टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे नाहीत. मात्र, अत्यवस्थ रुग्णांची संख्या वाढली असून, सध्या ३७३ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे.

मुंबईत मार्च २०२० पासून कोरोनाचा प्रसार सुरू झाला. आतापर्यंत ३ लाख २७ हजार ६१९ बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी तीन लाख पाच हजार ६३९ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत, तर ११ हजार ४७६ लोकांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत कोरोनाचा प्रसार पूर्णपणे नियंत्रणात आल्याचे वाटत असतानाच गेल्या महिन्यापासून बाधित रुग्णांची संख्या वाढली आहे.

दररोज आठशे ते एक हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. मात्र, ९,६३३ सक्रिय रुग्णांपैकी ३,२४८ रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे आहेत. त्यामुळे त्यांच्यावर पालिका व खाजगी रुग्णालयांत उपचार होत आहेत. सध्या रुग्णवाढीचा दैनंदिन सरासरी दर ०.२९ टक्का एवढा आहे, तर रुग्णसंख्या २३५ दिवसांनंतर दुप्पट होत आहे.

...अशी आहे सद्य:स्थितीप्रकार     उपलब्ध खाटा    दाखल रुग्ण    रिक्तसाधारण खाटा     ११,४८६     ३,५३१    ७,९५५            अति दक्षता     १,५५७    ७१२    ८४५            ऑक्सिजन     ८,०३३    २,०३१    ५,९९६व्हेंटिलेटर     ९४५    ४६७    ४७८

मुंबईत १ हजार १०३ रुग्ण; तर पाच जणांचा मृत्यू मुंबई : मुंबईत गुरुवारी १,१०३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. एकूण बाधितांची संख्या ३ लाख २९ हजार ८४३ एवढी आहे. गुरुवारी ६५४ रुग्ण बरे होऊन घरी परतले. आतापर्यंत ३ लाख ७० हजार २७ रुग्ण काेराेनामुकत झाले. दिवसभरात ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ११ हजार ४८७ इतकी झाली आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या