शहरं
Join us  
Trending Stories
1
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
2
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
3
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
4
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
5
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
6
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
7
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
8
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
9
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
10
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
11
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
12
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
13
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
14
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
15
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
16
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
17
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
18
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
19
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
20
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी

Corona Virus: रायगडच्या पर्यटनाला कोरोनाचा फटका; परदेशी पर्यटकांना नो एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2020 11:29 PM

हॉटेल, रिसॉर्टमधील बुकिंग रद्द

अलिबाग : सध्या कोरोनाच्या भीतीमुळे रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला मोठा फटका बसला आहे. शनिवारपासून लागोपाठ होळीची सुट्टी असल्याने अनेकांनी समुद्रकिनाऱ्यावर जाण्याचे बेत आखले. मात्र, कोरोनाच्या धसक्याने जिल्ह्यात येणाºया पर्यटकांना हे बेत रद्द करावे लागले आहेत. रिसॉर्ट, हॉटेल, लॉजिंगमध्ये केलेले बुकिंग रद्द केले आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचा फटका जिल्ह्यातील हजारो हॉटेल, रिसॉर्ट आणि समुद्रकिनाºयावरील व्यावसायिकांना बसला आहे.

परदेशी नागरिकांना जिल्ह्यात नो एन्ट्री असल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे. दरवर्षी होळीच्या निमित्त गजबजणारे समुद्रकिनारे यंदा सामसुम दिसत आहेत. जिल्ह्यातील अलिबाग, मुरूड, वरसोली, काशिद, दिवेआगार, हरिहरेश्वर, श्रीवर्धनमधील समुद्रकिनारे धूलिवंदन आणि होळी सणाच्या निमित्ताने गर्दीने फुलून जातात. हॉटेल्स आणि रिसॉर्टमध्ये तर जागाही मिळत नाही. मुंबई, पुणे, ठाणे या भागातून अनेक कुटुंबे चार दिवस येणाºया सुट्टीची संधी साधून आपल्या बच्चेकंपनीसह पर्यटनासाठी जाणार होते. मात्र, या वेळेला कोरोनाच्या भीतीमुळे अनेकांनी प्लॅन रद्द केले आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग आणि प्रशासनाने गर्दीची ठिकाणे टाळा, असे आवाहनही केले आहे.कोरोना विषाणू संसर्गजन्य रोग असल्याने जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने पावले उचलली असून नागरिकही सतर्कता बाळगत असल्याने यंदा होळीनिमित्त आणि सुट्टीमुळे जिल्ह्यात येणाºया पर्यटकांची संख्या रोडावली आहे. याचा फटका हॉटेल व्यावसायिकांना बसला आहे.रायगडमध्ये पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येणारे परदेशी पर्यटक अलिबाग, काशीद येथील उच्चभ्रू रिसॉर्टमध्ये राहतात. मात्र, जिल्हा प्रशासनाने खबरदारी म्हणून परदेशी पर्यटकांना जिल्ह्यात येण्यास मज्जाव केला आहे. बोटीने येणाºया पर्यटकांच्या तपासणीसाठी मांडवा जेट्टी येथेदेखील विशेष पथक आरोग्य विभागाकडून नेमले जाणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोनाtourismपर्यटन