शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Vaccine : ऑक्सफर्डची लस पास होणार की फेल?; मुंबई-पुण्यात मोठी टेस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2020 15:44 IST

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला कोरोना लसीच्या चाचणीतून समाधानकारक परिणाम मिळत आहेत.  ऑक्सफर्डने या लसीच्या उत्पादनासाठी भारतातील एसआयआयची निवड केली आहे. 

ठळक मुद्देही चाचणी ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस सुरू होईल. या लसीच्या मानवी चाचणीसाठी मुंबई आणि पुण्याच्या हॉटस्पॉट भागांतील तब्बल 4 ते 5 हजार स्वयंसेवकांची निवड करण्यात आली आहे.पुढील वर्षी जून महिन्यापर्यंत लस लॉन्च करण्यात येईल.

पुणे - ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि एस्ट्राजेनेकाने तयार केलेल्या कोरोना लसीची चाचणी भारतात लवकरच सुरू होणार आहे. ही चाचणी ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस सुरू होईल. या लसीच्या मानवी चाचणीसाठी मुंबई आणि पुण्याच्या हॉटस्पॉट भागांतील तब्बल 4 ते 5 हजार स्वयंसेवकांची निवड करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे, सर्व काही व्यवस्थित राहिले, तर पुढील वर्षी जून महिन्यापर्यंत लस लॉन्च करण्यात येईल, अशी आशा लसीचे स्थानीय उत्पादक सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाने (SII) व्यक्त केली आहे. 

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला कोरोना लसीच्या चाचणीतून समाधानकारक परिणाम मिळत आहेत. ऑक्सफर्डने या लसीच्या उत्पादनासाठी भारतातील एसआयआयची निवड केली आहे. 

लसीच्या चाचणीसाठी मुंबई-पुण्यातील हॉटस्पॉटची निवड -पुण्यात बुधवारपर्यंत तब्बल 59,000 हून अधिक कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर मुंबईतील कोरोना बाधितांचा आकडा 1 लाखच्याही वर पोहोचला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांपैकी अर्धे रुग्ण केवळ या दोन शहरांतीलच आहेत. एसआयआयचे सीईओ अदार पूनावाला यांनी सांगितले, 'लसीच्या चाचणीसाठी आम्ही मुंबई आणि पुण्यात काही जागा निश्चित केल्या आहेत. या शहरांत कोरोनाचे सर्वात जास्त हॉटस्पॉट आहेत. यामुळे आम्हाला लस किती प्रभावशाली आहे, याचे आकलन करण्यास मदत होईल.'

परवानगी मिळताच चाचणीला सुरुवात -एसआयआयचे सीईओ अदार पूनावाला म्हणाले, भारतीय औषध नियंत्रकांकडून परवानगी मिळताच ऑगस्टमध्ये लसीच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात केली जाईल. कंपनी चाचणी सुरू करण्यासाठी दोन दिवसांच्या आत औषध नियंत्रकांकडे लायसंन्ससाठी अर्ज करेल. तेथून एक ते दोन आठवड्यांत मंजुरी मेळेल अशी आशा आहे. यानंतर साधारणपणे तीन आठवडे स्वयंसेवकांना रुग्णालयांत आणण्यासाठी लागतील. अशा प्रकारे एक ते दीड महिन्यांत चाचणीला सुरुवात होईल, अशी आशा आहे.

भारतात किती रुपयांना मिळेल ही लस-पुण्यातील सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाचे (Serum Institute of India CEO Adar Poonawalla)  अदार पुनावाला यांनी सांगितले की संपूर्ण देश कोरोनाशी लढत आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी लसीची किंमत कमी ठेवण्यात येणार आहे. भारतात कोरोना लसीची किंमत १००० रुपये किंवा त्यांपेक्षा कमी असेल. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबईPuneपुणेEnglandइंग्लंड