शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
2
सनरायझर्स हैदराबादची फिल्डींग लैय भारी! आयुष बदोनी, निकोलस पूरन यांनी वाचवली LSG ची लाज
3
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
4
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
5
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
6
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
7
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
8
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
9
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
10
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
11
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
12
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
13
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
15
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
17
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
18
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
20
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...

Sputnik V Exclusive: रशियात राहणाऱ्या ठाणेकरानं घेतलेत Sputnik V चे दोन्ही डोस; जाणून घ्या त्यांचा अनुभव अन् लसीचे साईड इफेक्ट

By हेमंत बावकर | Published: May 22, 2021 6:07 PM

Side effects of corona vaccine sputnik v on Indians: रशियाची लस स्पुतनिक व्ही (Sputnik V) भारतात देण्यास सुरुवात झाली आहे. कोरोनावर आलेली ही जगातील पहिली लस असली तरीदेखील ती आल्याआल्याच वादात सापडली होती. जाणून घ्या या लसीचे भारतीयांना जाणवलेले साईड इफेक्ट आणि त्यांचा अनुभव...

- हेमंत बावकर

Side effects of sputnik v on Indians: कोरोनाशी लढण्यासाठी लसीकरण मोहिम लस टंचाईमुळे अडखळत सुरु असताना रशियाची लस स्पुतनिक व्ही (Sputnik V) भारतात देण्यास सुरुवात झाली आहे. कोरोनावर आलेली ही जगातील पहिली लस असली तरीदेखील ती आल्याआल्याच वादात सापडली होती. कमी लोकांवर चाचण्या करून घाईगडबडीने ही लस लाँच करण्यात आल्याचे आरोप होऊ लागले होते. यामुळे देशात कोव्हिशिल्ड (Covishield) आणि कोव्हॅक्सिन (Covaxin) मिळत असताना रशियाची ही लस घ्यायची की नाही, या बाबत लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाले आहेत. यामुळे 'लोकमत'च्या टीमने रशियात नोकरीनिमित्त गेलेल्या महाराष्ट्रीयन तरुणाकडून या लसीचे अनुभव, साईड इफेक्ट याबाबत जाणून घेतले आहे. (Sputnik V vaccine side effect, Price and vaccination Experience of Indian youth who working in Russia.)

Sputnik V Price: मोठी बातमी! रशियाच्या Sputnik V लशीची किंमत जाहीर; एक डोस 995.40 रुपयांना मिळणारभारतात रशियाच्या स्पुतनिक व्हीची नोंदणी आता कोविन अॅपवर झाली आहे. हैदराबाद स्थित डॉ. रेड्डीज ही कंपनी या लसीचे उत्पादन करणार आहे. भारतात ही लस खासगी हॉस्पिटलमध्ये एक डोस 995.40 रुपयांना (Sputnik V Price in India) मिळणार आहे. यामुळे ही लस घ्यायची की नाही, यापासून तिचे साईडइफेक्ट काय आहेत, याबाबत चला जाणून घेवुया... 

ठाण्यात राहणारे कौस्तुभ अळवणी (Kaustubh Alavani) हे रशियातील अमुर प्रांतामध्ये एका पेट्रोलियम, गॅस कंपनीत काम करतात. तिथे ते गेल्यावर्षी पहिला लॉकडाऊन लागण्य़ाआधी गेले आहेत. तिथे देखील कोरोनाची पहिली, दुसरी लाट येऊन गेली आहे. रशियन सरकारने स्पुतनिक व्ही ही लस परदेशातून आलेल्या कर्मचाऱ्यांना देण्याची परवानगी फेब्रुवारीमध्ये दिली होती. मात्र, लसीच्या उलटसुलट चर्चांमुळे अळवणी हे लस घ्यायची की नाही, या संभ्रमात होते. त्यांच्यासोबत अन्य भारतीय सहकारीदेखील होते. या सर्वांनी भारतात परतल्यानंतर कोव्हिशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, भारतात कधी परतणार याबाबत काहीच समजत नव्हते. यामुळे त्यांनी त्यांच्या कंपनीकडून देण्यात येत असलेल्या स्पुतनिक लसीसाठी नाव नोंदविले. (Kaustubh Alavani Experience about Sputnik V vaccination in Russia.)

रशियातले लोक घेतात, मग आपणही घेऊ, अशी मनाची समजूत घालून कौस्तुभ अळवणी यांनी लस घेतली. पहिला डोस त्यांना 6 एप्रिलला देण्यात आला. सकाळी हा डोस घेतला आणि सायंकाळी त्यांना काही सामान्य साईड इफेक्ट (side effect of Sputnik V) जाणवू लागले. यामध्ये सायंकाळी घरी आल्यावर ताप आला होता. कंपनीच्या डॉक्टरांनी याचा अंदाज दिला होता. यामध्ये अंग दुखी, लस घेतली त्या दंडावर दुखणे, थंडी-ताप असे साईड इफेक्ट जाणवले. डॉक्टरांनी गरज वाटली तरच पॅरॅसिटेमॉल गोळी घेण्यास सांगितले होते. (What are the side effect of Sputnik V vaccine on Indian's)

मोठी बातमी! 'स्पुतनिक-व्ही' लसीची ऑगस्टपासून भारतात निर्मिती, मे अखेरपर्यंत ३० लाख डोस आयात होणारमहत्वाची बाब म्हणजे अळवणी यांच्यासोबत असलेल्या 70 टक्के भारतीय सहकाऱ्यांना हेच साईड इफेक्ट जाणवले. तर उर्वरितांना काहीच साईड इफेक्ट जाणवले नाहीत, असे अळवणी यांनी सांगितले. दंडावरील दुखणे दोन दिवस जाणवले, दुसऱ्या दिवशी कामावर हजर झालो, असे ते म्हणाले. अन्य देशांच्या सहकाऱ्यांनाही आम्हाला जाणवले तसेच साईड इफेक्ट जाणवल्याचे ते म्हणाले. 

दुसऱ्या डोसवेळी काय... (What about second dose of Sputnik V)स्पुतनिक व्ही लसीचा दुसरा डोस (Sputnik V second Dose) हा रशियामध्ये 21 ते 50 दिवसांनी घ्यायचा आहे. अळवणी यांनी 21 दिवसांनी दुसरा डोस घेतला. यामध्ये पहिल्या डोस प्रमाणेच दोन दिवस अंगदुखी, ताप, दंडावर दुखत होते. काही भारतीय सहकारी त्या काळात मायदेशात परतले होते. ते पुन्हा कामावर आले, तेव्हा त्यांना 21 ते 50 दिवसाच्या मुदतीत असल्याने दुसरा डोस देण्यात आल्याचे ते म्हणाले. (Sputnik V second dose time duration.)

स्पुतनिक व्ही लस घ्यावी की न घ्यावी? सरकारी लसीची वाट पाहण्यापेक्षा ज्यांना शक्य असेल, लसीची किंमत परवडत असेल त्यांनी ही लस घ्यावी. कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन किंवा अन्य कोरोना लसींसारखेच सामान्य साईड इफेक्ट आहेत. यामुळे घाबरून जाऊ नये, असे आवाहन कौस्तुभ अळवणी यांनी केले आहे.  

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याrussiaरशिया