Corona Vaccine: गुड न्यूज! लहानग्यांसाठी ‘Covovax’ लस उत्पादनाला आठवडाभरात सुरूवात; अदार पूनावाला उत्सुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2021 23:32 IST2021-06-25T23:27:25+5:302021-06-25T23:32:19+5:30

येत्या आठवडाभरात आम्ही कोवोवॅक्सची पहिली खेप बनवण्यास सुरुवात करतोय, जी अमेरिकेतील बायोटेक्नोलॉजी फर्म नोवावॅक्सकडून बनवण्यात आली आहे. तिचं भारतात नाव कोवोवॅक्स ठेवण्यात आलं आहे.

Corona Vaccine: first batch of Covovax being manufactured this week at Pune Adar Poonawalla | Corona Vaccine: गुड न्यूज! लहानग्यांसाठी ‘Covovax’ लस उत्पादनाला आठवडाभरात सुरूवात; अदार पूनावाला उत्सुक

Corona Vaccine: गुड न्यूज! लहानग्यांसाठी ‘Covovax’ लस उत्पादनाला आठवडाभरात सुरूवात; अदार पूनावाला उत्सुक

ठळक मुद्देयेत्या आठवडाभरात पुण्यातील इन्स्टिट्यूटमध्ये ही खेप तयार केली जाईल. लस १८ वर्षापेक्षा कमी वयोगटातील मुलांना कोरोनापासून संरक्षण देण्याची क्षमता ठेवतं. SARS Cov2 मुळे होणाऱ्या मध्यम आणि गंभीर आजाराविरोधात ९०.४ टक्के प्रभावी ठरली आहे

पुणे – देशातील सर्वात मोठी लस उत्पादन करणारी कंपनी सीरम इन्स्टिट्यूटने पुण्यात कोवोवॅक्स(Covavax) लसीच्या उत्पादनात सुरूवात केली आहे. कंपनीचे सीईओ अदार पूनावाला यांनी ही माहिती दिली आहे. सीरमनं आणखी एक शिखर गाठलं आहे असं पूनावाला म्हणाले. तसेच येत्या आठवडाभरात आम्ही कोवोवॅक्सची पहिली खेप बनवण्यास सुरुवात करतोय, जी अमेरिकेतील बायोटेक्नोलॉजी फर्म नोवावॅक्सकडून बनवण्यात आली आहे. तिचं भारतात नाव कोवोवॅक्स ठेवण्यात आलं आहे.

सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदार पूनावाला यांनी ट्विट केले की, Covovax पहिल्या खेपीच्या उत्पादनासाठी मी उत्सुक आहे. येत्या आठवडाभरात पुण्यातील इन्स्टिट्यूटमध्ये ही खेप तयार केली जाईल. ही लस १८ वर्षापेक्षा कमी वयोगटातील मुलांना कोरोनापासून संरक्षण देण्याची क्षमता ठेवतं. त्याचं ट्रायल सुरू आहे असं ते म्हणाले. नोवावॅक्सच्या चाचणीत पाहायला मिळत आहे की, ही वॅक्सिन SARS Cov2 मुळे होणाऱ्या मध्यम आणि गंभीर आजाराविरोधात ९०.४ टक्के प्रभावी ठरली आहे. ऑगस्ट २०२० मध्ये झालेल्या करारानुसार नोवोवॅक्सने सीरमला (SII) कमी आणि मध्यम उत्पन्न असणाऱ्या देशांसोबत भारतातही लसीचं उत्पादन आणि पुरवठा करण्याचा परवाना दिला आहे.

सीरमने नोवोवॅक्स कंपनीसोबत २० कोटी डोस तयार करण्यासाठी करार केला आहे. यापूर्वी भारताच्या नीती आयोगाचे सदस्य व्ही के पॉल म्हणाले होते की, सार्वजनिकरित्या उपलब्ध असणारी आकडेवारी पाहिली तर नोवोवॅक्स लस ही सुरक्षित आणि प्रभावी आहे. ही लस सर्वात सुरक्षित मानली जाते. भारतात सीरम इन्स्टिट्यूटकडून या लसीचे उत्पादन केले जाणार आहे. नोवोवॅक्स इंकने सांगितले की, त्यांची लस ही कोविड १९ च्या विरोधात प्रभावी आहे. ही व्हायरसच्या सर्व व्हेरिएंटविरुद्ध संरक्षण देते. लस एकूण ९०.४ टक्के प्रभावी आहे. सुरुवातीच्या आकडेवारीनुसार ही सुरक्षित आहे.

Web Title: Corona Vaccine: first batch of Covovax being manufactured this week at Pune Adar Poonawalla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.