शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

Corona Vaccine: 19 लाख कर्मचाऱ्यांची नोंदणी, फक्त 3.5 लाख जणांनाच लस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 02:51 IST

Corona Vaccine: सीरमच्या लसीला मागणी, कोव्हॅक्सिनची लस घेण्यास नकारघंटा

- अतुल कुलकर्णीमुंबई : राज्यात आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाइन वर्कर अशा १८,४५,००० जणांनी कोरोनाची लस मिळावी म्हणून नोंदणी केली आहे. १६ जानेवारीपासून सुरू झालेल्या लसीकरणाच्या मोहिमेत आजपर्यंत फक्त ३,५४,६३३ जणांनाच लस मिळाली आहे. या गतीने राज्यातील साडेबारा कोटी लोकांना लस मिळायला किती दिवस जातील, याचे उत्तर कोणाकडेही नाही. महाराष्ट्राला भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि सीरमची कोव्हिशिल्ड अशा दोन लसी मिळाल्या आहेत. मात्र, व्हॅक्सिन लस घेण्यास कोणीही तयार नाही.राज्याला आजपर्यंत १९,७२,४०० डोस मिळाले आहेत. मात्र, हे दोन टप्प्यांसाठीचे असल्याने त्याचा लाभ फक्त ९,८६,२०० लोकांनाच होणार आहे. कारण हे डोस दोन टप्प्यांत द्यायचे आहेत. त्यातही कोव्हॅक्सिनचे १,७०,४०० डोस मिळाले असले तरी प्रत्यक्षात फक्त ३,५४५ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ही लस घेतली आहे. त्यामुळे जेवढी नाव नोंदणी झाली आहे त्यांनाही लस मिळण्यास अडचण आहे, तर सामान्यांना ती कधी मिळणार, असे विचारले असता केंद्राकडून लस आली की देणार, असे उत्तर अधिकारी देत आहेत. मंत्रालयातून किती झाली लसीकरणासाठी नोंदणीवैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी वगळता विविध विभाग आणि मंत्रालयातून जवळपास ५,९५,६५६ जणांनी लसीकरणासाठी नाव नोंदणी केली आहे.ज्यात महसूल विभागाच्या ३०,९७४, गृहविभागाच्या २,९६,९८४ आणि गृहनिर्माण व शहरी कामकाज विभागाच्या २,९६,९८४ कर्मचाऱ्यांंचा समावेश आहे.कोणतीही लस घेतली तरी परिणाम सारखाचआम्ही राज्यात जेवढे सेंटर्स सुरू करण्याचे ठरवले होते, त्याच्या अर्धेच सेंटर सुरू करण्यास केंद्राने मान्यता दिली आहे. आम्हाला लस जसजशी उपलब्ध होईल तशी ती देत राहू. ५११ सेंटर्स सुरू करण्याएवढे व्हॅक्सिन आलेले नाहीत. त्यामुळे २८५ सेंटर्स सुरू करू शकलो आहोत. अनेकांचा कल कोव्हिशिल्ड लस घेण्याकडे जास्त आहे; पण दोन्ही लसींचा परिणाम एकसारखाच आहे. त्यामुळे कोणीही घाबरून जाणे किंवा अमूक लस चांगली वाईट म्हणणे योग्य नाही. दोन्हीपैकी कोणतीही लस घेतली तरी परिणाम सारखाच आहे.- डॉ. तात्याराव लहाने, संचालक, वैद्यकीय शिक्षणबॉटम फाइव्ह जिल्हे :जिल्हा    नोंदणी     लस     टक्केवारी    झालेले     घेतलेलेसांगली    ३४,५९९    ८,५२५    २४.६४ परभणी    १०,५२१    २,६४७     २५.१६ बुलडाणा    २२,१२८    ५,६८५     २५.१६ औरंगाबाद    ४०,२९४    १०,५८४     २६.२७ पुणे    १,१९,००४    ३२,४०१     २७.२३ ज्या पुण्यात सीरम इन्स्टिट्यूटने लस बनवली त्याच पुण्यात लस घेणाऱ्यांचे प्रमाण फक्त २७.२३ टक्के आहे. राज्यात लस घेणाऱ्यांमध्ये पुण्याचा खालून पाचवा नंबर आहे. धुळे जिल्ह्याने मारली बाजीजिल्हा    नोंदणी     लस     टक्केवारी    झालेले     घेतलेलेधुळे    ११,४४१    ६,०८८     ५३.२१ भंडारा    ९,१९३    ४,८८६     ५३.१५ मुंबई    १,७५,२२२    ५७,५८५     ४९.४३ वाशिम    ६,७१९    ३,०८५     ४५.९१ वर्धा    २१,४४९    ९,१९७     ४२.८८

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस