शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढताहेत अलर्ट राहावे लागेल: देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 16:23 IST

लॉकडाऊन वाढविणे योग्य ठरणार येणार नाही...

ठळक मुद्देकोरोना परिस्थिती, महापालिकांच्या उपाययोजना याची घेतली माहिती

पिंपरी : महाराष्ट्रात वेगाने कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, त्यासाठी अलर्ट रहावे लागेल. मोठ्या प्रमाणात व्यवस्था उभ्या कराव्या लागतील. पावसाळ्यात आणखी रुग्ण वाढतील असा अंदाज आहे. त्यादृष्टीने महापालिकेकडून तयारी केली जात आहे. अतिरिक्त नमुने (स्वॅब) तपासण्याची सुविधा पालिका उभी करत आहे. माहिती घेऊन शासनाकडे तशी विनंती करेल, असे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कोविड समर्पित वायसीएम रुग्णालयाला भेट दिली. यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर आणि वायसीएमएचचे अधिष्ठता डॉ. राजेंद्र वाबळे यांच्याकडून  कोरोना सद्यस्थिती आणि उपाययोजनांची माहिती घेतली.

ऑक्सिजन बेड वाढविण्याची गरजफडणवीस म्हणाले, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत कोरोनाची लढाई कशी चालली आहे. विशेषत रुग्णालयाचे व्यवस्थापन कशाप्रकारे चालले आहे. कोणत्या प्रकारचे रुग्ण येतात. याची माहिती घेतली. वेगवेगळे प्रयत्न मोठ्या प्रमाणात चालले आहेत. महापालिकेने तयार केलेला डॅशबोर्ड चांगला आहे.  त्यामुळे काही प्रमाणात यशही आले आहे. गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात रुग्ण वाढू लागले आहेत. पावसाळ्यात रुग्ण वाढतील असा अंदाज आहे. त्यादृष्टीने महापालिकेकडून तयारी केली जात आहे. मोठ्या प्रमाणात आॅक्सिजन बेड उपलब्ध असतील. रुग्ण नियोजन चांगल्या प्रकारे करता येईल.’’

 व्यवस्था निर्माण करावी लागेलफडणवीस म्हणाले, ‘‘महाराष्ट्रातील एकूण परिस्थिती बघता ज्या वेगाने रुग्ण वाढ होत आहे. त्यासाठी फार अलर्ट रहावे लागेल. अधिक मोठ्या प्रमाणात व्यवस्था उभ्या कराव्या लागतील. त्यादृष्टीने कामकाज करावे लागेल. अतिरिक्त नमुने तपासण्याची सुविधा पालिका उभी करत आहे. त्याहीपेक्षा अधिकची आवश्यकता असेल. तर मी स्वत: माहिती घेऊन शासनाकडे तशी विनंती करेल.’’ 

लॉकडाउन वाढविणे योग्य ठरणार नाहीफडणवीस म्हणाले, ‘‘लॉकडाउन करता येईल, अशी परिस्थिती दिसत नाही. लोकांची मानसिकता देखील नाही. लॉकडाउनच्या काळामध्ये व्यवस्थापनाची  तयारी केली आहे. लोकांची जनजागृती वाढविली आहे. तो अधिक वाढवून आपल्याला लॉकडाउन नसाताना देखील कोविड संदभार्तील जे काही नियम आहेत. ते कसे पाळता येतील. याच्यावर जास्त भर द्यावा लागेल. त्यामुळे पुन्हा लॉकडाउनमध्ये परत जायच्याऐवजी आपल्याला समोर कसे जाता येईल. तरी, देखील कोविड कसा नियंत्रणात आणता येईल.’’

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliticsराजकारणCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटल