राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ; दिवसभरात १४,१६१ नव्या रुग्णांची नोंद, ३३९ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 09:38 PM2020-08-21T21:38:10+5:302020-08-21T21:44:02+5:30

राज्यात आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या ६ लाख ५७ हजार ४५० वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत २१ हजार ६९८ जणांचा मृत्यू झाला आहे.

Corona outbreak in the state, 14,161 new cases recorded in a day, 339 deaths | राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ; दिवसभरात १४,१६१ नव्या रुग्णांची नोंद, ३३९ जणांचा मृत्यू

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ; दिवसभरात १४,१६१ नव्या रुग्णांची नोंद, ३३९ जणांचा मृत्यू

Next

मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.  राज्यात शुक्रवारी १४ हजार १६१ नवे रुग्ण सापडले. तर दिवसभरात ३३९ जणांचा मृत्यू झाला. याशिवाय, ११ हजार ७४९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ७१.३९ टक्के आहे. 

राज्यात १ लाख ६४ हजार ५६२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या ६ लाख ५७ हजार ४५० वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत २१ हजार ६९८ जणांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर, राज्यात ११ लाख ९२ हजार ६८५ रुग्ण होम क्वारंटाईन आहेत. तर ३५ हजार १३२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

राज्यात ३२६ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ४२, ठाणे १७, नवी मुंबई मनपा ११, कल्याण डोंबिवली मनपा ७, वसई विरार मनपा५, पालघर ११, नाशिक १६, पुणे ६३, पिंपरी चिंचवड मनपा १८, सोलापूर ८, सातारा १३, कोल्हापूर २०, सांगली १२, नागपूर १७ आणि अन्य १ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या एकूण ३३९ मृत्यूंपैकी २६० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ४८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.

उर्वरित ३१ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३१ मृत्यू पुणे १०, ठाणे ९, नाशिक ३, अहमदनगर २, कोल्हापूर २, नंदुरबार १, सांगली १, सातारा १, सोलापूर १ आणि पालघर १ असे आहेत. आज ११,७४९ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ४,७०,८७३ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.६२ टक्के एवढे झाले आहे.

राज्यात ११ हजार ७४९ रुग्ण बरे
दिलासादायक बाब म्हणजे गेल्या २४ तासांत राज्यात ११ हजार ७४९ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ४ लाख ७० हजार ८७३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.६२ टक्के एवढे झाले असून सध्या मृत्यूदर ३.३० टक्के एवढा आहे.

मुंबईत २४ तासांत १,४०६ नव्या रुग्णांची वाढ, ४२ जणांचा मृत्यू!
मुंबई गेल्या २४ तासांत १ हजार ४०६ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून ४२ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनोबाधितांची संख्या १ लाख ३४ हजार २२३ वर पोहोचली असून यापैकी आतापर्यंत ७ हजार ३५३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या २४ तासांत मुंबईत १२३५ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत १ लाख ८ हजार २६८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, अशी माहिती बृहन्मुंबई महापालिकेने दिली आहे.

Web Title: Corona outbreak in the state, 14,161 new cases recorded in a day, 339 deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.