शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

धक्कादायक! मुंबईत कोरोनाची उच्चांकी रुग्णवाढ, एकाच दिवसात आढळले ३०६२ नवे रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2021 06:54 IST

गेल्या वर्षीच्या तुलनेत शुक्रवारी आतापर्यंतची सर्वाधिक तीन हजार ६२ रुग्णांची नोंद झाली असून, दहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याआधी ८ ऑक्टोबर २०२० रोजी मुंबईत दिवसभरात सर्वाधिक २८४८ रुग्ण नोंदवले गेले होते.

मुंबई: आतापर्यंतची सर्वाधिक दैनंदिन कोरोना रुग्णवाढीची नोंद शुक्रवारी मुंबईत झाली. दिवसभरात तब्बल ३०६२ बाधित रुग्ण सापडल्याने चिंता वाढली आहे. पुढील चार ते सहा आठवडे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे पालिकेने जाहीर केले आहे. त्यामुळे कोरोनाचे संकट रोखण्यासाठी चाचण्यांचे प्रमाण दुप्पट करण्यात येणार आहे. तसेच मृत्यूचे प्रमाणही कमी करून शून्यावर आणण्यासाठी पालिकेच्या उपाययोजना सुरू आहेत. गेल्या महिन्यापासून मुंबईत दररोज एक हजाराहून अधिक रुग्ण सापडत होते. ही संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. दररोज रुग्णसंख्येत चारशे ते पाचशेने वाढ होत आहे. (Corona outbreak in Mumbai, 3,062 new cases found in a single day)गेल्या वर्षीच्या तुलनेत शुक्रवारी आतापर्यंतची सर्वाधिक तीन हजार ६२ रुग्णांची नोंद झाली असून, दहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याआधी ८ ऑक्टोबर २०२० रोजी मुंबईत दिवसभरात सर्वाधिक २८४८ रुग्ण नोंदवले गेले होते. मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आता १२४ दिवसांवर आला आहे, तर सरासरी दैनंदिन रुग्णवाढीचे प्रमाण ०.५६ टक्क्यांवर पोहोचले आहे.

‘४८ तासांमध्ये सज्ज व्हा’जुलै २०२० मधील स्थितीशी तुलना करता, मुंबईतील शासकीय रुग्‍णालयांमधील खाटांची संख्‍या अधिक आहे. पालिका रुग्‍णालयांमध्‍येदेखील ही क्षमता वाढविण्‍यात येत आहे. त्‍याच धर्तीवर सरकारी रुग्‍णालयांप्रमाणे सर्व खासगी रुग्‍णालयांनी पुन्‍हा कोविड खाटांची संख्या येत्‍या ४८ तासांमध्‍ये वाढवावी, अशी सूचना मुंबई पालिका आयुक्तांनी केली आहे. यामध्ये ऑक्सिजन, आयसीयू खाटा असाव्यात, त्यासाठी साधनसामग्री व मनुष्‍यबळ आदी सर्व व्‍यवस्‍था युद्धपातळीवर करून सर्व कार्यवाही पूर्ण केल्‍याची माहिती रुग्‍णालयांनी ४८ तासांची मुदत संपताच पालिकेला द्यावी, अशी सूचनाही करण्यात आली आहे.

मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणणारमुंबईत आतापर्यंत ११ हजार ५६५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी दहा जणांचा मृत्यू झाला, यात पाच पुरुष व पाच महिलांचा समावेश आहे. यापैकी आठ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते, तर तीन रुग्ण ४० वर्षांवरील व सात रुग्ण ६० वर्षांवरील होते. आतापर्यंत ३६ लाख ६२ हजार ४७२ चाचण्या करण्यात आल्या. मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणण्याचा निर्धार महापालिकेने केला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टरState Governmentराज्य सरकारMumbaiमुंबईUddhav Thackerayउद्धव ठाकरे