शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे वृक्षलागवडीच्या नियोजनाचा ‘दुष्काळ’! सरकारकडून उद्दिष्ट,नियमावलीवर शून्य हालचाल  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2020 14:00 IST

पावसाळ्याच्या सुरवातीला सर्वत्र वृक्षलागवडीचे कार्यक्रम सुरू होतात. सरकारकडून विभागांना उद्दिष्ट दिले जाते.

ठळक मुद्देनागरिकांनी मागणी केल्यास रोपं मिळणारनागरिक स्वत:च पुढाकार घेऊन वृक्षलागवडीसाठी करत आहे प्रयत्न पुणे शहरातील वन विभागाच्या टेकड्यांवर आणि इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होते वृक्षलागवडगेल्या चार वर्षांमध्ये ५० कोटी वृक्षलागवडीचे दिले होते उद्दिष्ट

श्रीकिशन काळे -पुणे : पावसाळा सुरू होण्यापूर्वीच ठिकठिकाणी वृक्षलागवड करण्याचे काम हाती घेण्यात येते. मात्र, यंदा कोरोनामुळे वृक्षलागवडीवर देखील संक्रांत आली आहे. वन विभागाकडून यंदा कोणतेही नियोजन केलेले नाही, तसेच सरकारकडून काहीही नियमावली आलेली नाही. त्यामुळे कोरोनामुळे सरकारकडून राबविल्या जाणाऱ्या वृक्षलागवडीला ब्रेक लागला आहे.पावसाळ्याच्या सुरवातीला सर्वत्र वृक्षलागवडीचे कार्यक्रम सुरू होतात. सरकारकडून विभागांना उद्दिष्ट दिले जाते. पण यंदा कोणतेही उद्दिष्ट दिले नाही आणि त्याबाबत अजून हालचाल देखील झाली नाही. नागरिक स्वत:च पुढाकार घेऊन वृक्षलागवडीसाठी प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे.पुणे शहरातील वन विभागाच्या टेकड्यांवर आणि इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड होते. पण यंदा वरिष्ठ पातळीवरून काहीच सूचना किंवा नियमावली आलेली नाही. दरवर्षी पाऊस आला की, नागरिक वृक्षारोपणासाठी आमच्याकडे विचारणा करतात. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रोपं विक्रीसाठी देखील ठेवतो. पण अजून काहीही नियोजन नाही. वृक्षलागवडीचा कार्यक्रम घेताना गर्दी होते. सुरक्षित अंतर ठेवून कार्यक्रम होत असतील तर चांगले आहे, अशी माहिती पुणे वन क्षेत्र अधिकारी दीपक पवार यांनी दिली.=================गेल्या चार वर्षांमध्ये ५० कोटी वृक्षलागवडीचे उद्दीष्ट दिले होते. पण यंदा कोरोनामुळे नियोजन झालेले नाही. पण आम्ही आमच्या विभागाकडून तयारी करीत आहोत. तसेच ज्या ग्रामपंचायतींची इच्छा असेल, त्यांना रोपं उपलब्ध करून देऊ. ज्यांनी वृक्षलागवड करतील, त्यांच्याकडून जीपीएस छायाचित्र घेण्यात येणार आहे. कोरोनामुळे प्रत्येक ठिकाणची परिस्थिती वेगळी आहे. सर्वत्र एकच नियम लागू नाही. वृक्षलागवडीची नियमावली आल्यानंतरच ते शक्य आहे.- रघुनाथ नाईकडे, मुख्य वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण===================दरवर्षी पावसाळ्यापुर्वी नागरिक आमच्याकडे रोपं घेऊन जातात.  सध्या कोरोनामुळे लोकांमध्ये सामाजिक सुरक्षेबाबत जागृती झाली आहे. त्यानूसार वृक्षलागवड करण्यात येत आहे. राज्यातून रोपांसाठी मागणी आहे. टेकड्यांवर फिजिकल डिस्टंन्सिंग ठेवून वृक्षलागवड होऊ शकते.- रघुनाथ ढोले, ट्री मॅन आणि नर्सरी विक्रेते=================

वृक्षलागवडीचे उद्दिष्ट२०१६ - २ कोटी२०१७- ४ कोटी२०१८- १३ कोटी२०१९ - ३३ कोटी२०२० - ००  

टॅग्स :PuneपुणेState Governmentराज्य सरकारenvironmentपर्यावरणRainपाऊसforestजंगल