सहपोलीस आयुक्तांची मुंबईला बदली
By Admin | Updated: July 9, 2016 00:49 IST2016-07-09T00:49:35+5:302016-07-09T00:49:35+5:30
राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात आज फेरबदल झाले असतानाच गृहविभागाने विशेष पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या चार अधिकाऱ्यांच्याही बदल्या केल्यात. नागपूरचे सहपोलीस आयुक्त

सहपोलीस आयुक्तांची मुंबईला बदली
नागपूर : राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात आज फेरबदल झाले असतानाच गृहविभागाने विशेष पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या चार अधिकाऱ्यांच्याही बदल्या केल्यात. नागपूरचे सहपोलीस आयुक्त राजवर्धन सिन्हा यांच्या नावाचाही बदलीच्या यादीत समावेश आहे. राजवर्धन आता विशेष पोलीस महानिरीक्षक (तुरुंग) म्हणून मुंबईला जबाबदारी सांभाळणार आहेत. अत्यंत हुशार, मितभाषी आणि सौजन्यशील अधिकारी म्हणून राजवर्धन ओळखले जातात. त्यांच्या जागी संतोष रस्तोगी हे आता नागपूरचे सहपोलीस आयुक्त म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे.
१९९८ च्या बॅचचे आयपीएस असलेले रस्तोगी केंद्रात प्रतिनियुक्तीवर (सीबीआय) गेले होते. ३० मे २०१६ ला ते आपला कार्यकाळ पूर्ण करून परत महाराष्ट्रात आले. तेव्हापासून ते नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. मध्यंतरी त्यांना नागपुरात ह्यआॅब्जर्व्हरह्ण म्हणून पाठविण्यात येणार असल्याचीही चर्चा होती. या चर्चेचा वेगवेगळा अर्थ लावला जात असतानाच रस्तोगी यांना आज नागपूरचे सहपोलीस आयुक्त म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली.
--
उपायुक्तांच्याही अंतर्गत बदल्या
पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव यांनीही आज शहरातील पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या करून अनेकांना धक्का दिला. नव्या फेरबदलानुसार परिमंडळ चारचे उपायुक्त ईशू सिंधू यांना विशेष शाखेची जबाबदारी सोपविण्यात आली. दोन आठवड्यांपूर्वी नागपुरात आलेले जी. श्रीधर यांना परिमंडळ चारचे उपायुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले तर, गुन्हेशाखेच्या आर्थिक विभागाचे (ईओडब्ल्यू) उपायुक्त म्हणून राकेश कलासागर यांची नियुक्ती करण्यात आली.