वीजबिल भरून सहकार्य करा, महावितरणचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2021 02:59 IST2021-02-16T02:59:14+5:302021-02-16T02:59:29+5:30
electricity bill : राज्यातील ४१ लाख ७ हजार घरगुती ग्राहकांसह विविध वर्गवारीतील ८० लाख ३२ हजार ग्राहकांनी एप्रिल २० ते जानेवारी २०२१ या १० महिन्यांच्या काळात एकही वीज बिल भरले नाही.

वीजबिल भरून सहकार्य करा, महावितरणचे आवाहन
मुंबई : लाॅकडाऊन काळात ग्राहकांकडे वीजबिलाची काेट्यवधीची थकबाकी आहे. त्यामुळे बिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी ग्राहकांना केले आहे.
राज्यातील ४१ लाख ७ हजार घरगुती ग्राहकांसह विविध वर्गवारीतील ८० लाख ३२ हजार ग्राहकांनी एप्रिल २० ते जानेवारी २०२१ या १० महिन्यांच्या काळात एकही वीज बिल भरले नाही. त्यामुळे थकबाकीमध्ये काेट्यवधींची भर पडली असून महावितरणला प्रचंड मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. ग्राहकांना २४ तास वीज पुरवठा करण्यासाठी दर महिन्याला वीज खरेदी करावी लागते. महावितरणची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन ग्राहकांनी वीज बिलांचा भरणा करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.