शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

तुळजाभवानीच्या पुजारी मंडळावरून पेटला वाद, आजी-माजी पदाधिकारी आमने-सामने

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 11:53 IST

श्री तुळजाभवानी पुजारी मंडळाच्या वर्तनावरून व व्यवहारावरून नवाच वाद पेटला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कतुळजापूर (जि. धाराशिव): श्री तुळजाभवानी पुजारी मंडळाच्या वर्तनावरून व व्यवहारावरून नवाच वाद पेटला आहे. आजी-माजी पदाधिकारी यात आमने-सामने आले असून, धर्मादाय आयुक्तांपर्यंत लेखी तक्रारी पोहोचल्या आहेत. विद्यमान विश्वस्त मंडळ उद्देशाविरुद्ध वर्तणूक ठेवून भ्रष्टाचाराचा अड्डा झाला असल्याचा आरोप माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांनी केला आहे. तर विद्यमान अध्यक्षांनी यामागचे बोलविते धनी कोण, हे समोर आणू, असे प्रत्युत्तर देऊ केले आहे.

पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांनी धर्मादाय आयुक्तांकडे केलेल्या लेखी तक्रारीनुसार, विश्वस्तांनी न्यासाच्या प्रॉपर्टीबद्दल जे दुर्लक्ष केलेले आहे, त्यामुळे मोठे नुकसान झालेले आहे. या प्रकाराची चौकशी होऊन  सध्याचे विश्वस्त मंडळ तात्काळ बडतर्फ किंवा निलंबित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच पुजारी मंडळ स्थापनेचा जो उद्देश आहे, त्याविरुद्ध वर्तन सध्या सुरु असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांच्यासह इतरही काही पुजाऱ्यांनी याबाबतीत तक्रार केली आहे. यास विद्यमान अध्यक्षांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

कागदपत्रांसह उत्तर सादर करणारतीर्थक्षेत्र तुळजापूर विकास आराखड्यामुळे काही जणांची पुजारी मंडळ ताब्यात घेण्याची धडपड सुरू आहे. मात्र, यासाठी आपल्या पुजारी बांधवांची दिशाभूल करू नका, इतकंच सांगणं आहे. सध्या हा विषय धर्मादाय आयुक्त यांच्याकडे निर्णयासाठी गेला असला तरी  लवकरच चांगल्या आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या विचारांचे लोक मंडळात यावेत, ही इच्छा आहे.  त्यासाठी आमचा प्रयत्न राहील. आम्ही जे काम केले, त्याची माहिती कागदपत्रांसह सादर करु. सोबतच, काही स्वार्थी लोक आणि त्यांच्या पाठीमागील सूत्रधार यांचीही माहिती समोर आणू, असे पुजारी मंडळाचे प्रभारी अध्यक्ष विपीन शिंदे यांनी म्हटले.

विठ्ठलाच्या लाडू प्रसादामध्ये अळ्या पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या लाडू प्रसादाच्या पाकिटामध्ये चक्क अळ्या आणि लाडूला बुरशी लागल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी समोर आला आहे. लाडू बनविणाऱ्या लोकांवर कारवाई करावी, अशी मागणी मनमोहन अनिल अभंगराव यांनी केली. दरम्यान, लाडूमध्ये नव्हे तर  पाकिटामध्ये अळी दिसून येते. लाडू दररोज तयार करून विकले जातात. हा प्रकार गंभीर आहे. संबंधित कामगारांना नोटीस दिली आहे, असे व्यवस्थापक राजेंद्र राऊत यांनी सांगितले. 

टॅग्स :tuljapur-acतुळजापूरMaharashtraमहाराष्ट्रdharashivधाराशिव