शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2024 13:54 IST

पटेल यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानंतर महाविकास आघाडीकडून होणारा शा‍ब्दिक हल्ला थांबणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Praful Patel ( Marathi News ) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे नेते आणि राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यात जिरेटोप घातल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर शिवप्रेमींच्या आक्रमक प्रतिक्रिया उमटल्या. तसंच महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही पटेल यांच्यावर टीकेची झोड उठवली. या सगळ्या वादंगानंतर आता प्रफुल्ल पटेल यांनी एक पाऊल मागे घेत यापुढे काळजी घेऊ, असा शब्द शिवप्रेमींना दिला आहे.

जिरेटोप वादावर आपल्या एक्स हँडलवर प्रतिक्रिया देत प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे की, "हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आणि प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या आदर्शांवर व लोककल्याणाच्या मार्गावर मार्गक्रमण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान होईल, अशी कोणतीही गोष्ट कधी मनातही येऊ शकत नाही. यापुढे काळजी घेऊ."

दरम्यान, प्रफुल्ल पटेल यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानंतर महाविकास आघाडीकडून होणारा शा‍ब्दिक हल्ला थांबणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

नाना पटोलेंनी काय म्हटलं होतं?

प्रफुल्ल पटेल यांच्यावर निशाणा साधताना नाना पटोले यांनी म्हटलं होतं की, "हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाकडून सातत्याने केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप चढवून छत्रपती शिवाजी महाराज व त्यांना मानणाऱ्या करोडो शिवभक्तांचा अपमान केला आहे. या अपमानाबद्दल प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर माफी मागावी", अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती.

दरम्यान, "प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान मोदींना जिरेटोप घातला यात पंतप्रधानांचा दोष काय?" अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली होती. तसंच जिरेटोपावरुन राजकारण करु नये, ज्यांनी जिरोटोप घातला त्यात पंतप्रधानांचा यात काय दोष? अशा प्रकाराची पुनरावृत्ती होणार नाही, असं शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :Praful Patelप्रफुल्ल पटेलNCPराष्ट्रवादी काँग्रेसShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजNarendra Modiनरेंद्र मोदीAjit Pawarअजित पवार