शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लतादीदींच्या स्मारकावरून विसंवादी सूर, काँग्रेस-भाजपकडून शिवाजी पार्कात स्मृतिस्थळाची मागणी, सेनेचा केंद्राकडे अंगुलीनिर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 11:41 IST

शिवाजी पार्क येथे लतादीदींचे भव्य स्मारक उभारण्याची मागणी राम कदम यांनी केली आहे. यासंदर्भात कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविल्याचेही सांगितले आहे.

मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनानंतर आता त्यांच्या स्मारकावरून विसंवादी सूर उमटू लागले आहेत. शिवाजी पार्क येथे लतादीदींचे भव्य स्मारक उभारण्याची मागणी भाजपचे आमदार राम कदम यांनी केली आहे, तर स्मारकाबाबत राजकारण करू नये, असे आवाहन करतानाच लतादीदींच्या स्मारकाबाबत केंद्र सरकारनेच विचार केला पाहिजे, असे म्हणत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केंद्राला यात ओढण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसनेही शिवाजी पार्कातच स्मारक व्हायला हवे, असे सांगत भाजपच्या सुरात सूर मिसळला. शिवाजी पार्क येथे लतादीदींचे भव्य स्मारक उभारण्याची मागणी राम कदम यांनी केली आहे. यासंदर्भात कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविल्याचेही सांगितले आहे. जिथे दीदींवर अंत्यसंस्कार झाले, त्या पंचतत्त्वात विलीन झाल्या, त्याच जागेवर स्मृतिस्थळ उभारायला हवे. तिथे जगाला प्रेरणा देईल, असे आंतराष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हायला हवे, अशी करोडो देशवासीयांची भावना असल्याचेही ते म्हणाले. त्याचा सन्मान करून सरकारने तातडीने स्मारकाचे काम सुरू करावे, अशी मागणीही कदम यांनी केली. काँग्रेसनेही या मागणीला एका अर्थाने पाठिंबा दिला आहे. लतादीदी यांचे स्मारक हे शिवाजी पार्कमध्येच व्हायला हवे, तेसुद्धा आंतराष्ट्रीय दर्जाचे असायला हवे. देशातून व जगातून येणाऱ्या लोकांना लतादीदींच्या स्मारकाला भेट दिल्यानंतर त्यांचा गोड आवाज स्मरायला हवा. कालच्या, आजच्या व उद्याच्या पिढीला स्मरणात राहील, अशा दर्जाचे स्मारक शिवाजी पार्कमध्ये व्हावे, ही काँग्रेसची भूमिका असल्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले. 

देशाला विचार करावा लागेल - राऊतशिवसेना नेते संजय राऊत यांनी हा विषय केंद्र सरकारकडे ढकलण्याचा प्रयत्न केला. लतादीदी या महान होत्या. आपल्या भूमीत त्यांनी जन्म घेतला, महाराष्ट्राशी त्यांचे नाते आहे. त्या शरीराने गेल्या. आत्मा आपल्याकडे आहे. त्या अमर राहतील. काही लोक त्यांच्या स्मारकाबाबत बोलत आहेत. त्यांचे स्मारक बनिवणे सोपे नाही. त्यासाठी केंद्र सरकारने विचार करायला हवा. दीदींच्या स्मारकाबाबत देशाला विचार करावा लागेल, असे राऊत म्हणाले. 

टॅग्स :Lata Mangeshkarलता मंगेशकरSanjay Rautसंजय राऊतRam Kadamराम कदमcongressकाँग्रेस